DNA Live24 2015

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन

अहमदनगर :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या 62 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2018 कुस्ती स्पर्धेसाठी राहता तालुक्यातील चितळी अहमदनगर जिल्हा तालिम संघाची कुस्ती निवड चाचणी स्पर्धा रविवार दि.2 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवड चाचणीसाठी सर्व तालुकास्तरीय विजयी संघांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, निवड चाचणीचे आयोजक तथा राहता तालिम संघाचे अध्यक्ष पै.रविंद्र वाघ व जिल्हा तालिम संघाचे उपाध्यक्ष पै.रविंद्र वाघ यांनी केले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी जिल्हा तालिम संघाचे कार्याध्यक्ष पै.रामभाऊ लोंढे, सचिव धनंजय जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, खजिनदार पै.नाना डोंगरे, छबुराव जाधव, नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, अ‍ॅड.अभिषेक भगत, पै.विलास चव्हाण, युवराज पठारे, पै.कुंडलिक चिंधे, वसंत लकडे, गणपत खेमनर, बबलू धुमाळ, हंगेश्‍वर धायगुडे, गणपत खेमनर, प्रमोद भांडकर, प्रविण घुले, विक्रम बारवकर, बबन काशिद, संदिप बारगुजे, दिपक डावखर, रामभाऊ नळकांडे, आंतराष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री फंड, मोहन हिरनवाळे, बाळू भापकर आदि उपस्थित राहणार आहे.

या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92 व 97 किलो वजनगट व महाराष्ट्र केसरी गटासाठी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील विजयी मल्ल जालना येथे होणार्‍या 62 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गादी-माती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब लढत कुस्ती स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी पै.रविंद्र वाघ मो.नं. 9922798994, पै.वैभव लांडगे मो.नं. 9822135035, पै.नाना डोंगरे मो.नं. 9226735346 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget