DNA Live24 2015

तर उत्सव काळात 'यास' मिळेल परवानगी

अहमदनगर :
जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांना शासननिर्णय व अधिसूचनेनुसार दिलेल्‍या अधिकाराचा वापर करुन सन 2018 या वर्षाकरिता  14 एप्रिल 2018 डॉ. आंबेडकर जयंती, 1 मे 2018 महाराष्‍ट्र दिन,  गणपती उत्‍सव -4 दिवस ( 14 सप्‍टेंबर 2018 दुसरा दिवस, 17 सप्‍टेंबर 2018  पाचवा दिवस (गौरी विसर्जन), दहावा दिवस 22 सप्‍टेंबर 2018 व 23 सप्‍टेंबर 2018 अनंत चतुर्दशी)  नवरात्री उत्‍सव 2 दिवस  17 ऑक्‍टोबर 2018 अष्‍टमी , व 18 ऑक्‍टोबर 2018 नवमी,  दिवाळी 7 नोव्‍हेंबर लक्ष्‍मीपूजन, 21 नोव्‍हेंबर 2018 ईद ए मिलाद,  25 डिसेंबर 2018  खिसमस, 31 डिसेंबर 2018 व उर्वरित 3 दिवस राखीव मा. जिल्‍हाधिकारी यांचे मान्‍यतेनुसार महत्‍वाच्‍या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे.

केंद्र शासनाच्‍या  ध्‍वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्‍या नियम 5 उपनियम (3) व त्‍यासोबत दिलेल्‍या स्‍पष्‍टीकरणात्‍मक टिपणीनुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनीवर्धक यांचा वापर श्रीतृगहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्‍या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्‍हयाच्‍या निकडीनुसार वर्षामध्‍ये 15 दिवस निश्‍चित करुन सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यत सूट जाहिर करण्‍याकरिता संबंधित जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी यांन राज्‍य शासनाने आदेशान्‍वये प्राधिकृत केले आहे.

 उत्‍सव कालावधीत ध्‍वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरणाने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी-  ध्‍वनी प्रदुषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करावे तसेच ध्‍वनी प्रदुषण नियम 2000 अंतर्गत स्‍थापन केलेल्‍या प्राधिकरणाने त्‍यांचेकडे प्राप्‍त तक्रारीवर उच्‍च न्‍यायालयाने दि. 16 ऑगस्‍ट 2016 रोजी दिलेल्‍या आदेशात विहित पध्‍दतीने कार्यवाही करावी.  पोलिस ठाणेच्‍या हद्दीत शांतता क्षेत्राची माहिती घेवून या भागातील ध्‍वनी मापक संयंत्राद्वारे ध्‍वनीचे कंट्रोल नमुने घ्‍यावेत. त्‍याबाबत पंचनामा व ठाणे दैनंदिनीमध्‍ये नोंद घ्‍यावी ( शांतता क्षेत्र, मिरवणुकीचा मार्ग, महत्‍वाची ठिकाणे ).  एखाद्या ठिकाणी ध्‍वनी प्रदुषण होवून आजूबाजूच्‍या लोकांना या सर्व सामान्‍य जनतेस त्रास होत आहे अशी तक्रार आल्‍यास  ती लिहून घ्‍यावी व स्‍टेशन डायरीला नोंद करुन त्‍या तक्रारीचे खरे खोटेपणा पाहण्‍यासाठी घटनास्‍थळी जावे.

घटनास्‍थळी गेल्‍यावर दोन पंचाच्‍या समक्ष ध्‍वनीची तीव्रता मोजण्‍याच्‍या उपकरणाच्‍या सहाय्याने घटनास्‍थळी ध्‍वनीची तीव्रता किती आहे याची नोंद घ्‍यावी. घटनास्‍थळाचे छायाचित्रण करावे. मोजलेली तीव्रता ही मानद मर्यादेपेक्षा अधिक असल्‍यास उचित प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत.  घटनास्‍थळी जाणा-या पोलिस अधिका-याने आपल्‍या अहवालसोबत चौकशीचे सर्व कागदपत्रे त्‍वरीत पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 व ध्‍वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण)नियम 2000 मधील तरतूदीप्रमाणे निर्माण करण्‍यात आलेल्‍या प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्‍या आदेशामधील  सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्‍याची दक्षता घ्‍यावी व निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्‍या  आदर्श आचारसंहितेचा नियमावलीचा भंग होणार  नाही याची दक्षता घ्‍यावी असे जिल्‍हादंडाधिकारी राहुल  द्विवेदी यांनी एका आदेशान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget