DNA Live24 2015

संविधानाचे सामुदायिक वाचन करुन डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

अहमदनगर :
भिंगार येथे आरपीआयच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

महात्मा गांधी रोड येथे आरपीआयचे भिंगार युवक शहराध्यक्ष अमित काळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष जेव्हिअर भिंगारदिवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भाजपचे वसंत राठोड, शिवाजी दहिहंडे, ग्रा.पं. सदस्य मयुर पाखरे, आशिष बोंदर्डे, मंगेश मोकळ, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बेलपवार, शिवसेनेचे अनिल मट्टू, संतोष गायकवाड, शुभम खराडे, स्वप्निल खरात, भाजप युवा मोर्चाचे किशोर कटोरे, रामभाऊ भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, पांडूरंग भिंगारदिवे, युवराज पाखरे, सचिन शिंदे, वसंत भिंगारदिवे, पवन भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, संतोष सारसर, सचिन धिवर, पप्पू शेख, धनराज जाधव, करण काळे, लक्ष्मीकांत तिवारी, ब्रिजेश लाड, सिध्दार्थ उबाळे, बबन चव्हाण, कुमार कदम आदिंसह भिंगारचे नागरिक उपस्थित होते.

अमित काळे म्हणाले की, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सुत्रे आली. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. संविधान एका समाजापुरता मर्यादित नसून सर्व भारतीयांचा आहे. संविधानाने देशात समता, बंधुता व स्वतंत्र्यता प्रस्थापित झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 
संविधान दिना निमित्त आरपीआयच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रमाचे चौथे वर्ष होते. तसेच यावेळी मुंबई येथे झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget