DNA Live24 2015

पहिल्या निसर्गोपचार दिन दिवशी निसर्ग प्रेमींसाठी मेजवाणी

अहमदनगर : 
आयुष मंत्रालय भारत सरकाने दि. 18 नोव्हेंबर हा निसर्गोपचार दिन म्हणुन जाहिर केला आहेत्यानिमित्त इंटरनॅशनल नॅचोरोपॅथी ऑर्गनायझेशन अहमदनगर व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.18 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 4 वाजता बुर्हाणनगर येथील श्रीराम मंदिरात निसर्गोपचार व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
निसर्गोपचार सप्ताहाचे सांगता या कार्यक्रमाव्दारे केला जाणार असून या कार्यक्रमात डॉ.हेमा सेलोत यांचे आहार व सर्गोपचार,डॉ.विश्वास फाफाळेपुणे यांचे अत्यावश्यक व तातडीचे वेळी अॅक्युप्रेशर चिकित्साश्री.सुभाष जाधव यांचे वनस्पतीव्दारे निसर्गोपचार व रोग निवारण यावर व्याख्याने व प्रात्यक्षीके आयेाजित केली असून ती सर्वांसाठी मोफत आहेत.

या कार्यक्रमात श्री.सुवालालजी शिंगवी बापुजीश्री.नरेंद्रभाऊ फिरोदियाश्री.जितेंद्रजी बिहाणीव श्री.विनायक अण्णा देशमुख आदींसह सर्व निसर्गोपचार प्रेमींसोबत समाजातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेतरी सर्व नगरकरांनी दु.4 वाजता श्रीराम मंदिरबाणेश्वर कॉलनीबुर्हाणनगर येथे या कार्यक्रमाचा भरभरुन लाभ घ्यावाअसे आवाहन आयएनओच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा नाबरिया यांनी केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget