DNA Live24 2015
December 2018

अहमदनगर :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्‍हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांच्‍या संयूक्‍त विद्यमाने सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात  15 ते 29 या वयोगटातील युवक-युवतीकरिता दिनांक 17 डिसेंबर 2018 रोजी रावसाहेब पटवर्धन स्‍मारक ,भिस्‍तबाग रोड, प्रोफेसर कॉलनी, अहमदनगर येथे जिल्‍हास्‍तरीय युवा महोत्‍सवाचे अयोजन करण्‍यात आले आहे. हा महोत्‍सव स्‍पर्धात्‍मक व अस्‍पर्धात्‍मक अशा दोन प्रकारांमध्‍ये होणार आहे.

या महोत्‍सवात स्‍पर्धात्‍मक प्रकारामध्‍ये लोकनृत्‍य, लोकगीत, एकांकीका (इंग्रजी/हिंदी),शास्‍त्रीय गायन (हिंदुस्‍तानी), शास्‍त्रीय नृत्‍य, सितार, बासरी, तबला, वीणा, मृदंग, हार्मोनियम,(लाईट), गिटार, मणिपुरी नृत्‍य, ओडिसी नृत्‍य, भारतनाटयम, कथ्‍थक, कुचिपुडी नृत्‍य, वक्‍तृत्‍व  यांचा समावेश आहे. तर अस्‍पर्धात्‍मक  प्रकारामध्‍ये  राज्‍याच्‍या संस्‍कृतीचे दर्शन घडविणारे  कार्यक्रम आयोजित करण्‍यात येणार आहेत.  या स्‍पर्धामध्‍ये जिल्‍हयातील शाळा, महाविद्यालय, संगीत अॅकॅडमी, नृत्‍य अॅकॅडमी, युवक मंडळी सहभागी व्‍हावे,असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी,अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

अहमदनगर :
जिल्‍हयातील  गुणवंत क्रीडा मार्गदर्शक , गुणवंत क्रीडा कार्यकर्ता व गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांच्‍या  क्रीडा क्षेत्रातील कार्याचे/योगदानाचे मुल्‍यमापन होऊन त्‍यांच्‍या गौरव व्‍हावा व त्‍यांना  क्रीडा क्षेत्राच्‍या विकासासाठी  प्रोत्‍साहन मिळावे या उद्देशाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे.

जिल्‍हा क्रीडा पुरस्‍काराचे स्‍वरुप रोख रु. 10 हजार, प्रमाणपत्र व स्‍मृतिचिन्‍ह असे आहे. दरवर्षी  अनुक्रमे एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, एक गुणवंत क्रीडा कार्यकर्ता  व दोन गुणवंत खेळाडू (एक पुरुष व एक महिला) यांना पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे.

शासनाने  एशियन गेम्‍स, कॉमनवेल्‍थ गेम्‍स, जागतिक चषक क्रीडा स्‍पर्धा (सर्व गट), आशियाई अजिंक्‍यपद स्‍पर्धा (सर्व गट), राष्‍ट्रकूल अजिक्‍यपद स्‍पर्धा (सर्वगट) , युथ ऑलिम्पिक गेम्‍स, युथ कॉमनवेल्‍थ  गेम्‍स,  युथ जागतिक  अजिंक्‍यपद /युथ  जागतिक चषक स्‍पर्धा  या आंतरराष्‍ट्रीय  स्‍पर्धेत  सहभागी झालेल्‍या  खेळाडूंना थेट पुरस्‍कार देण्‍यात. येणार आहे. असा पुरस्‍कार ज्‍यादाचा पुरस्‍कार समजण्‍यात असेही शासन निर्णयात नमूद करण्‍यात आले आहे.

या पुरस्‍कारासाठी जिल्‍हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर येथे कार्यालयीन कामकाजाचे दिवशी दिनांक 20  डिसेंबर 2018 पर्यत विहित नमुन्‍यातील अर्ज  उपलब्‍ध होतील. सदर अर्ज दिनांक 26 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यत सीलबंद पाकीटात  जिल्‍हा क्रीडा कार्यालय, जिल्‍हा क्रीडा संकुल वाडियापार्क  टिळक रोड अहमदनगर येथे जमा करावेत. उशीरा आलेल्‍या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी  दूरध्‍वनी क्रमांक 0241- 2470415 येथे संपर्क साधावा असे क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी एका प्रसिध्‍दीप‍त्रकान्‍वये कळविले आहे.

अहमदनगर :
आरबीआयच्या आदेशान्वये सेंट्रल बॅक ऑफ इंडियाने पेन्शनधारकांना कर्ज देण्यास निर्बंध आनल्याने माजी सैनिकांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. या प्रश्‍नासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, बँकेने काढलेल्या परिपत्रकाने माजी सैनिकांना कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

आरबीआयने सेंट्रल बॅक ऑफ इंडियाला देशातील पेन्शन धारकांना कर्ज न देण्याचा फतवा काढला होता. देशातील अनेक माजी सैनिकांचे या बँकेत खाते असून, त्यांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने खा.दिलीप गांधी यांना निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून सेंट्रल बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा, आरबीआय व पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. बँकेने नुकतेच एक परिपत्रक काढले असून, यामुळे माजी सैनिकांना कर्ज मिळणे सुकर झाले आहे. संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून, या निर्णयाने देशातील खातेधारकांना न्याय मिळाला आहे. या निर्णयाचे फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, संभाजी वांढेकर, भाऊसाहेब देशमाने, संजय पटेकर, बन्सी दारकुंडे, विठ्ठल लगड, दिगंबर शेळके, रमेश जगताप आदिंनी स्वागत केले आहे. 

अहमदनगर :
इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित पी.ए. इनामदार शाळेत वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या. क्रीडा मशाल घेऊन बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांनी केलेले संचलन, धावणे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आदि क्रीडा सामन्यांचे लक्षवेधी सामन्यांनी मेळाव्याची रंगत वाढली. 

मुकंदनगर येथील नवनिर्वाचित नगरसेवक आसिफ सुलतान व नगरसेविका रिजवाना शेख यांच्या हस्ते आकाशात कबुतर व फुगे सोडून क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अब्दुलरहिम खोकर, शाळेचे प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख, फारुक शेख, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सादिक सय्यद, सहसचिव कादिर शेख, कलिमउल्ला शेख आदिंसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविकात फरहाना शेख यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणार्‍या विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांची माहिती दिली. तसेच जिल्हा व राज्यस्तरावर खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला. क्रीडा शिक्षक अक्षय साळवे यांनी होणार्‍या विविध स्पर्धेची माहिती दिली. हारुन खान यांनी खेळाने विद्यार्थ्यांचा शाररीक व मानसिक विकास होतो. तसेच मैदानी खेळाने निर्णय क्षमता व नेतृत्व गुणाचा विकास होऊन स्वत:मधील क्षमता ओळखता येते. क्रीडांगणावरील खेळाडू जीवनात आत्मविश्‍वासाने यश संपादन करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 आसिफ सुलतान म्हणाले की, जीवनात  यशस्वी होण्यासाठी ध्येय स्पष्ट असला पाहिजे. खेळात आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंना खेळाचे बाळकडू शाळेतच मिळाले असते. उत्तम आरोग्य व शरीर सदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळांची गरज असून, विद्यार्थ्यांनी मोबाईल व संगणकमध्ये न गुरफटता मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन त्यांनी केले. क्रीडा मेळाव्यात हिरवा, लाल, पिवळा व निळा रंगाच्या सामुहिक गटात विद्यार्थ्यांच्या विविध मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरोज नायर व राजिक खान यांनी केले. क्रीडा मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अहमदनगर :
ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम म्हणजे भारतीय सैन्यदलाप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे.  देशासाठी आपले तारुण्य आणि प्राणाची आहुती देणा-या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी वापरल्या जाणा-या ध्वजदिन निधीत योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, आणि प्रत्येक घटकाने हे कर्तव्‍य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज येथे केले.

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2018 च्या संकलनाचा शुभारंभ आज जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालयाच्या प्रांगणातील महासैनिक संकुल येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. द्विवेदी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी प्रशांत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, ले. कर्नल के.ए. काशिद,  कर्नल विक्रम दाते, जि.प माध्‍यमिकचे शिक्षणाधिकारी  लक्ष्‍मणराव पोले व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राजेद्रकुमार जाधव (निवृत्‍त) यांच्यासह जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता,  वीरपिता,  माजी सैनिक,  सैनिकांचे नातेवाई व नागरीक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.द्विवेदी म्हणाले की, सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचा आजचा हा दिवस म्हणजे सैन्यदलाबाबत समाजमनाला जागृत करण्याचा प्रयत्न आहे. सैनिक देशाच्‍या संरक्षणासाठी  सीमेवर जावून  लढतात. त्‍यांच्‍या कुटूंबाच्‍या संरक्षणासाठी  नागरिकांनी  जबाबदारी पारपाडण्‍यासाठी का‍ही मदत केली तर ते कमीच आहे असे सांगितले.

अहमदनगर जिल्‍हयाने मागील पाच वर्षापासून शंभर टक्‍केपेक्षा अधिक निधी  संकलित केला जातो. सन 2017 मध्‍ये शासनाने 1,84,98,480 उद्दिष्‍ट दिले होते. तर जिल्‍हयाने 2,27,96,641  निधी संकलीत केला असून  123.23 टक्‍के  निधी संकलित करण्‍यात आला. यामध्‍ये श्री साईबाबा विश्‍वस्‍थ संस्‍था शिर्डी यांनी 1 कोटी, जिल्‍हा परिषदेचे शिक्षण विभाग माध्‍यमिक 57 लाख,73 हजार, 540, महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 10 लाख 56 हजार 350, म. रा. वि.वि.कंपनी अहमदनगर 3 लाख 67 110, कमांडिग ऑफसर 17 महाराष्‍ट्र बटालियन एन सी सी 95 हजार व जिल्‍हयातील प्रमुख शाळा सेक्रेट हार्ट कॉनव्‍हेंट हायस्‍कूल अहमदनगर 3 लाख 57 हजार 425, रेसिडेन्‍सीयल हायस्‍कूल,अहमदनगर 1 लाख 72 हजार 353,  व भाऊसाहेब फिरोदिया  हायस्‍कूल अहमदनगर 72 हजार रुपयाचे उत्कृष्ट योगदान दिल्याचेही श्री. द्विवेदी  यांनी नमूद केले.

निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री पाटील म्‍हणाले, देशाच्‍या सीमेवर संरक्षण करणा-या जवानाचा आदर करावा. तसेच सैनिकांचे  योगदान विसरता येणार नाही व प्रशासन मदत करण्‍यास कटीबध्‍द राहील असे  सांगितले.

प्रास्ताविकात श्री. जाधव यांनी ध्वजदिन निधी संकलनाचे 2017 चे उदिष्‍ट जिल्ह्याने पुर्ण केले असल्याची माहिती दिली. तसेच  या निधीचा उपयोग माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणा-या कुटुंबियांच्या कल्याणासाठी केला जातो, असे सांगितले.

प्रारंभी दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच शहीद जवानांना श्रध्‍दांजली वाहण्यात आली. जिल्ह्यातील शहीद वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता तसेच वीरपत्नींचा, कुटुंबियांचाही यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला. विशेष गौरव पवुरस्‍कार प्राप्‍त माजी सैनिकांच्या पाल्यांचा सत्‍कार व धनादेशांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात ध्वजदिन निधीच्या संकलनाचे उद्दीष्ठ पुर्ण करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्‍यात आले.

तसेच जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधींच्या ध्वजांचे वितरण करून, निधी संकलनासही शुभारंभ करण्यात आला. तसेच  महारथी  महाराष्‍ट्राचे   या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. अमोल बागुल यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार बी. यु. ठाणगे यांनी मानले. याप्रसंगी विविध कार्यालयांचे प्रमुख तसेच अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते

विभागीय रेल्वे प्रबन्धक श्री हितेंद्र मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विभागीय रेलवे सलागार समिती सदस्य बैठकीत अहमदनगरहून मराठा चेंबर्स चे सदस्य हरजीतसिंह वधवा उपस्थित होते.
या प्रसंगी बैठकीत खाली प्रश्न उपस्थित करण्यात आले, 
1) मुंबई शिर्डी पॅसेंजर गाडीला 7 बोगी वाढून सम्पूर्ण गाडी धावण्यात यावी. तसेच पुणे- लखनौ, पुणे गोरखपूर या गाडीला अहमदनगर येथे थांबा देण्याची विनंती करण्यात आली. त्याप्रसंगी वरिष्ठ वाणिज्य अधिकारी श्री आर.के.शर्मा यांनी हा प्रस्ताव मुंबई सेंट्रल ला टाइम टेबल मध्ये समाविष्ट करण्याकरिता पाठविण्यात आल्याची माहिती दिली.
2) सर्व मेल गाड्याना अहमदनगर येथे 5 मिनिटंचा थांबा दिल्यास, लगेज बरोबर पार्सल सुविधा देखील शुरू होईल आणि त्यामुळें व्यपारी आणि शेतकऱयांना त्याचा फायदा होईल आणि सम्पूर्ण भारतात मटेरियल पाठवण्याची सोयी होईल. या वेळेस या बद्दल चाचपणी करून विचार करण्याची त्यांनी गवाही दिली.
3) कॉड लाईन संदर्भात तसेच नगर पुणे इंटरसिटी या गाडी बद्दल श्री मल्होत्रा यांनी सांगितले की कॉड लाईन ही पिहली प्राथमिकता असून त्याकरिता हालचाल शुरू आहेत, तसेच इंटरसिटी आणि नवीन गाड्या दबलिंग नंतर शुरू करू, परंतु इंटरसिटी करीता डेमु संदरबात चाचपणी आणि प्रायोगिक तत्वावर शुरू करण्याची मागणी श्री वधवा यांनी आणि दौंडच्या सदस्यांनी केल्यास त्यांनी फिसबिलिटी तपासून घेण्याचे अश्वशांन दिले.
4) फूड प्लाझा येथे साफ सफाई नसून, गाडीत देखील तो विकत असल्याची तक्रार केली असताना, चोकशीचा आदेश देण्यात येईल.
5) यावेळेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर लेडीज टॉयलेट बंध असून, एकसिलेतर चे काम हळू शुरू असल्याने, चालण्यासाठी जागा कमी होत आहे म्हणून एकसिलेतर चे काम होत असल्याने पॅसेंजरला गैरसुविधा होत असल्याचे सांगितले आणी  लवकर करण्याची मागणी करण्यात आली. 
या वेळेस सोलापूर, लातूर, दौंड, गुलबर्गा, येवला,उस्मानाबाद, उदगीर, पंढरपूर, कुरुडवादि आदी ठिकाणाहून सदस्य उपस्थित होते.
बैठकीत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.
स्वागत श्री मल्होत्रा यांनी केले, श्री शर्मा यांनी सर्व सदस्यांचे  प्रश्न मांडून.
अतिरिक्त विभागिया रेल्वे प्रभांडक वी. के.नागर, वरिष्ठ परिचालन अधिकारी श्री वंजारी, विभागीय रेल्वे आयुक्त (सुरक्षा) श्री. जयंत कृपाकर आदी उपस्थित होते.
बैठक सोलापूर येथील विभागीय रेल्वे कार्यल्यात पार पडली. अहमदनगरहून श्री आर.के गांधी वाणिज्य अधिकारी उपस्थित होते.
Attachments are

'विषमुक्त शेती व निरोगी भारत' अभियानाबद्दल करणार सविस्तर मार्गदर्शन

अहमदनगर :
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता आता विषमुक्त शेती ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी बीव्हीजी ग्रुपने 'विषमुक्त शेती व निरोगी भारत' हे अभियान सुरू केले आहे. त्याबद्दलची माहिती नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समजून घेण्याची संधी शनिवारी (दि. १५) मिळाली आहे. श्रीगोंदा येथील प्रबोधन व्याख्यानमालेत सकाळी ११ वाजता बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत,

तीनदिवशीय महामानव बाबा आमटे प्रबोधन व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक अनंत झेंडे यांनी केले आहे. मांडवगण रोडवरील घुगलवाडगाव (ता. श्रीगोंदा) येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्र येथे ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. ते म्हणाले की, शेतीचा उत्पादन-खर्च कमी करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी बीव्हीजी ग्रुपने पुढाकार घेतला आहे. श्री. गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली बीव्हीजीने 'विषमुक्त शेती व निरोगी भारत' हे अभियान सुरू केले आहे. त्याबद्दल या व्याख्यानात ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात लाखो शेतकऱ्यांनी बीव्हीजी कृषी तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात शेतीचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करण्यात यश मिळविले आहे. विषमुक्त व दर्जेदार शेतमालास जगभरात मोठी मागणी आहे. अशा शेतमालाच्या उत्पादनासह विक्री आणि प्रक्रिया व्यवस्थानाबद्दल या व्याख्यानात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या व्याख्यानासाठी शेतकऱ्यांनी उपथित राहावे.

दिल्लीतून महाराष्ट्राकडे पहिले की फक्त एकाच नेत्याची राज्यव्यापी व्याप्ती डोळ्यात ठसते, तो नेता म्हणजे शरद पवार. माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री, माजी कृषिमंत्री, काँग्रेस पक्षाचे माजी नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आणि सर्वेसर्वा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु, कला व संस्कृतीचे रसिक, क्रिकेट खेळाचे संघटक, शेतीचे अभ्यासक, सहकारामधील महर्षी आणि बरेच काही...

शरद पवार यांची नेमकी ओळख काय, असा प्रश्न अनेकांना पडला. साहेबांच्या मनाचा थांगही अनेकांना लागला नाही तर त्यांची नेमकी ओळख मी कशी सांगू शकणार? पण एक गोष्ट मात्र पक्की आहे. ती म्हणजे पवार साहेब हे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नरत असलेले महान नेते आहेत. म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चार कौतुकाचे शब्द लिहावेसे वाटतात.

लहानपणी देवभोळा धर्मवादी असलेला मी कॉलेजमध्ये आल्यावर मात्र, परिस्थितीच्या झटक्यांनी एकदम बदललो. पहिल्यांदा मतदान करताना भाजप हाच  पर्याय असल्याचे वाटत होते. मात्र, दरम्यान माझा अबोलपण सोडून मी बोलकाही झालो. मात्र, याच काळात विचारांनी डावा बनल्याने व्यवस्था आणि प्रस्थापित यांना शिव्याही घालत होतो. आधी उजव्या बाजूने पाहताना भाजप म्हणजे देशाचा विचार असे समजणार मी आता डाव्या बाजूने सगळ्यांकडे पाहत होतो. शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर हेच कम्युनिस्ट म्हणा किंवा समाजवादी विचार 'स' सोडून माजवादात बदलले. त्यावेळी पवार साहेब, काँग्रेस, काँग्रेसी विचार यांच्याकडेही डाव्या बाजूने पाहताना फालतूचे ज्ञान पाजळले. पत्रकारितेतही आपणच श्रीकृष्ण असल्याचा आव आणून समाजाच्या अन्यायाला वाचा फोडत बसलो.

पण दुसऱ्यांच्या मर्यादा शोधण्याच्या नादात आपलाच व्याप विस्तारण्याचा राहून जाते, अशा शब्दांत मित्राने (किशोर रक्ताटे) डावेपणाची झूल उतरायला भाग पडले. दरम्यानच्या काळात देशासह राज्यातही सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी गुजरातेतून थेट दिल्ली आले. विचारांचा समाजवादी दृष्टिकोन व स्व. शरद जोशी यांच्या विचारांतील काही भाग लक्षात घेऊन शेतीच्या उन्नतीसाठीचे माझे प्रयत्न मी सुरू केले. मोदींच्या विकासाचा फोलपणा पत्रकारितेने समजून सांगितला होताच. पण डाव्या बाजूने सगळीकडे पाहताना काँग्रेस असोत की पवार साहेब, सगळ्यांना बोल लावून हेच व्यवस्थेची वाट लावणारे असल्याची मांडणी करीत होतो.

मात्र, देशातील सत्तेबरोबरच माझा व्यवस्था व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मध्यममार्गी बनला. आधी उजवीकडून सुरु झालेला प्रवास डावेपणाकडे झुकला आणि आता मात्र, मध्यममार्गी विचार हेच समाजाची व देशाची गरज असल्याचे पटले आहे. मध्यममार्गी म्हणजे मध्यमवर्गीय कोते विचार नाही हं. कारण, मध्यवर्गीय विचार हा आपमतलबी असतो. घरात बसून समाजाच्या सेवेच्या बाता नसतात करायच्या. त्यासाठी कृती करावी लागते. त्यासाठी विचार असायला पाहिजे.

असा कृतियुक्त विचार म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकांनी आपापल्या काळात सामाजिक उन्नतीचे कार्य केले. काहींना यात यश आले तर काहींना अपयश. मात्र, हेतू चांगला असलेल्या याच मंडळींनी महाराष्ट्र आणि आपला भारत देश घडविला आहे. धर्म व जात याच्या पलीकडे जाऊन त्या नेत्यांनी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. असेच सध्याचे नेतृत्व म्हणजे पवार साहेब.

काँग्रेस, देशाची समाजवादी व्यवस्था, सर्वधर्मसमभावाचा विचार, धर्मनिरपेक्षता आणि पवार साहेबांना बोल लावीत विकासाची फळे चाखणारे सध्या बहुसंख्य भेटतात. भारताच्या उन्नतीसाठी कोणीतरी श्रीकृष्ण येईल अशाच थाटात बाता मारतात. सल्लेही जोमाने देतात. स्वप्नरंजन करून विकासाच्या गप्पाही मारतात. मात्र, त्याचवेळी शेती आणि शेतकरी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला हातभार लावण्याचे काम पवार साहेब करीत असतात. पक्षभेद विसरून ते हे काम करतात. त्याचा कुठेही उगीच बडेजाव मिरवण्याची गरज त्यांना वाटली नाही.

डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने मी पवार साहेबांकडे पाहिलेले आहे. एकदाही न भेटता त्यांना बोल लावण्याचा बोलघेवडेपणाही केला आहे. आता मला स्वतःचेच त्याबद्दल कौतुक वाटते. माहिती व ज्ञान आणि विचार व समज यामधील सीमारेषा समजण्याची गरज आहे. मगच पवार साहेबांच्या कामाची उंची समजू शकते. सर्वांच्या भावनांना कोणीही गोंजारु शकत नाही. पण महिला व वंचित घटकांसाठी काम करताना सक्षम जाती व धर्म यांची पर्वा न करता काम करणे म्हणजेच देशाच्या विकासासाठी काम करणे. हाच विचार घेऊन पवार साहेब कार्यमग्न आहेत आणि यापुढेही राहतील.

शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांनी एकदा पवार साहेबांची साथ दिली होती. पण नंतर दोघेही वेगळे झाले. याचे कारण त्या दोघानांचा माहित. मात्र, आताही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी हे पवार साहेबांकडे आकर्षित झाले आहेत. ते राजकीय अपरिहार्यतेपोटी आकर्षित झाले की साहेबांचे कार्य समजल्याने हे माहित नाही. पण हा बदलही महाराष्ट्राला नक्की पुढे घेऊन जाणारा असेल. फक्त बोलून सामाजिक उन्नती होणार नाही. त्यासाठी झपाटलेपणाने काम करावे लागेल. विषयाची समज घेऊन उत्तरे शोधावी लागतील. अशी उत्तरेही समाजाला पचनी पडणारी व सकारात्मक दिशा देणारी असायला पाहिजेत. मलाही पवार साहेब अशी दिशा दाखविणारे मार्गदर्शक वाटतात.

डाव्या किंवा उजव्या बाजूने नाही, तर नॉर्मल दृष्टिकोनातून पाहिल्याशिवाय पवार साहेबांचे काम नाही दिसू शकत. त्यासाठी मात्र, वेळ यावी लागते. या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या (अव)कृपेने ही वेळ माझ्यासाठी आली. तुम्हालाही वेळ आल्यावर समजेल या विचारी नेत्याची महती...

साहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

- सचिन मोहन चोभे,
मो. ९४२२४६२००३


अलाहाबाद :
पाच राज्यांतील निवडणूक निकाल लागल्याने आता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री योगी यांचे फोटो वापरीत पोस्टरबाजी केली जात आहे. याचे फोटो सोशल मीडियात जोरात व्हायरल होत आहेत.

लखनऊ येथील धर्म संसदेबाबत पोस्टरबाजी केली जात आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या या धर्म संसदेच्या निमित्ताने लावलेल्या पोस्टरवर मोदींना जुमलेबाजी का नाम म्हटले आहे. तर, योगींना हिंदुत्वाचा ब्रँड म्हटले आहे. हे पोस्टर कोणी व नेमके का लावले, याबद्दल चर्चा सुरू आहे.


दिल्ली :
पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजप बॅकफूटवर गेल्याचे चित्र पाहून आता शिवसेनेच्या शिडात हवा भरली आहे. त्यामुळेच ते मंदिर मुद्यावर आक्रमक होत आज संसदेत याबद्दल चर्चेसाठी आग्रही झाले आहेत.

शिवसेनेची संसदेत ‘हर हिंदू की पुकार, पहले मंदिर फिर सरकार’यावर बोलण्यासाठी आतुर झाली आहे. भाजप विरोधात निकाल आल्यानंतर राम मंदिरच्या मुद्द्यांवरून शिवसेना आक्रमक झाल्याचा हा परिपाक आहे. राम मंदिर संदर्भात शिवसेनेला बोलण्याची संधी द्यावी, यावर शिवसेनेने लोकसभा अध्यक्षांना नोटीस दिली आहे. लोकसभेत हा मुद्दा मांडणार आहे.

दिल्ली :
भाजपाला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार झटका बसल्याने नेते व कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. अशावेळी काय करावे हे सुचत नसल्याने त्यांना अंधश्रद्धा आणि अपशकुनाचा विचार डोक्यात घेतल्याची बातमी सामना वृत्तपत्राचे ऑनलाईन आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. 'भाजपचे नवे कार्यालय अपशकुनी असल्याची चर्चा' अशी बातमी सामानात प्रसिद्ध झाली आहे. त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सामना वृत्तपत्राने बातमीत म्हटले आहे की, भाजपने 6 ए पंडित दीनदयाळ मार्गावर अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे आलिशान कार्यालय उभारले असले तरी हे कार्यालय काही भाजपसाठी लकी नाही. ते सोडा, तिथला गाशा गुंडाळा आणि परत 11 अशोका रोड या जुन्या कार्यालयातून कारभार चालवा अशी कुजबूज भाजपच्या वर्तुळात ऐकायला मिळाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसह त्यानंतरच्या जवळपास प्रत्येक विधानसभा निवडणुकीचे संचलन हे 11 अशोका रोडच्या कार्यालयातून झाले होते. मात्र भाजपचे कार्यालय आलिशान करण्याच्या नादात हे मुख्यालय पंडित दीनदयाळ मार्गावर गेल्यापासून भाजपचे ग्रह बदलल्याचे भाजपच्या एका नेत्याने खासगीत सांगितले. याच कार्यालयातून कर्नाटकची निवडणूक हाताळली गेली होती त्यात फटका बसला. आता पाचही राज्यांत अपयश पदरी आले. नवेकोरे कार्यालय भाजपसाठी पनवती असून पुन्हा जुन्याच कार्यालयातून कारभार हाका, अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षश्रेष्ठी या पनवतीवर काय उपाय योजतात हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

मुंबई :
शिवसेना-भाजपचे विळ्या-भोपळ्याचे नाते सत्तेच्या राजकारणात टिकून आहे. मात्र, कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी भाजपवर सामना या मुखपत्रातून टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही. पाच राज्यांतील भाजपच्या पराभवावर खरमरीत लेख, बातम्या व अग्रलेख लिहितानाही सामना पेपरने भाजपाला 'नमोहराम' करण्याची संधी साधली आहे.

सामना म्हणजे खरमरीत व जळजळीत अग्रलेख व बातम्या. हे समीकरण शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पक्के आहे. आताही संपादक व खासदार संजय राऊत यांच्यासह सेने नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सामानाने ही परंपरा जपली आहे. भाजपच्या जाचाने शिवसैनिक हैराण आहेत. मात्र, राजकीय गरज लक्षात घेऊन त्यांचा भाजपशी घरोबा कायम आहे. त्याचेच प्रतिबिंब वेळोवेळी सामानातून दिसते.

आजही निवडणूक निकालावर स्पष्ट भाष्य करताना या वृत्तपत्राने भाजपाला डिवचले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यातही त्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. त्यांचे नेतृत्व कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी स्पष्ट करून भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याचाही प्रयत्न केल्याचे वाचकांचे म्हणणे आहे.

मुंबई : 
शिवसेना नेते उद्धव ठाकरे असोत की इतरही नेते व आमदार आणि कार्यकर्ते. या सगळ्यांनी चार वर्षांत सापत्न वागणूक सहन केली आहे. मात्र, पक्षफुटीच्या धास्तीने शिवसेनेने हा सर्व अपमान मुकाट्याने गिळला. मात्र, पाच राज्यांतील निकालात जनतेने भाजपाला 'बुरे दिन'चा झटका दाखविला. परिणामी आता शिवसेनेशी लवकरच पुन्हा युती घट्ट करण्यासाठीची पळापळ राज्यातील भाजप धुरिणांनी केली आहे.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडत आहेत. ‘सेनेशी युतीसाठी चर्चा लवकरच सुरू होईल. आगामी लोकसभा व विधानसभा या दोन्हींसाठी युती घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे स्पष्ट संकेत त्यामुळेच पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. एकूणच अडगळीत टाकलेल्या शिवसेनेला आता खऱ्या अर्थाने उभारी येणार आहे. मात्र, आता सेने नेते व कार्यकर्ते मागील चार वर्षांतील अपमान विसरून पुन्हा भाजपाची गळाभेट घेणार की स्वबळावर लढून महाराष्ट्र राज्य एकहाती काबीज करण्याचा प्रयत्न करणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

पुणे :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या अपयशामुळे शिवसेना पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. आता सेवेशी घरोबा करण्याशिवाय भाजपाला पर्याय नाही. मात्र, याच निवडणुकीने काँग्रेस पक्षाला ताकद मिळाल्याने मित्रपक्ष राष्ट्रवादीसह इतरही पक्षांना उत्साहाचे भरते आले आहे. मात्र, या निकालामुळे काँग्रेसची ताकद वाढल्याने आता राष्ट्रवादीची बर्गेनिग पॉवर कमी झाली आहे, तर शिवसेनेची वाढली आहे.

विळ्या-भोपळ्याचे नाते असल्याचे दिसत असतानाही राज्य व केंद्रात शिवसेना व भाजप एकत्र सत्तेची फळे चाखत आहेत. सेनेला त्यामुळे मोठा मनस्ताप सहनही करावा लागला. मात्र, आता याच्या उलट परिस्थिती होऊन भाजपची हवा या निकालाने गुल होणार आहे. तर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाव वधारल्याने राष्ट्रवादीला आता आपला टॉप गिअर काढून न्यूट्रल भूमिकेत येऊन आघाडीच्या जागावाटपाची चर्चा करावी लागणार आहे.

अहमदनगर :
मतदानाचे कर्तव्य बजाविण्यासाठी गेलेल्या पत्रकार तथा संपादक संदीप रोडे यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करून, संबंधित पोलीस अधिकार्‍यावर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, सुमित वर्मा, मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित, तुषार हिरवे, अभिषेक मोरे आदी उपस्थित होते.

पत्रकार संदीप रोडे हे पत्नीसह ज्ञानसंपदा शाळेत मतदानासाठी गेले होते. मोबाईल मतदान केंद्रांमध्ये नेण्यास बंदी असल्याने ते मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल घेऊन थांबले असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी रोडे यांना काठीने मारहाण करून, पोलिसांच्या गाडीत टाकत त्यांना तोफखाना पोलीस स्टेशनला आनून गंभीर गुन्ह्यात तडीपार असलेल्या आरोपीच्या कोठडीत डांबण्यात आले. गंभीर स्वरूपाचा गुन्हा नसताना देखील एका पत्रकाराला मारहाण करून पोलीस कोठडीत डांबल्याचा मनसेने निषेध व्यक्त केला आहे. प्रसार माध्यम व वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अशाप्रकारे पत्रकारांना मारहाण होणे ही लोकशाहीची गळचेपी असल्याची भावना गजेंद्र राशिनकर यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिस अधिकार्‍यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अहमदनगर :
वादग्रस्त वक्तव्याने शेतकर्‍यांची चेष्टा करणारे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी जाहिर माफी मागावी व प्रशासनाने दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्याची मागणी नगर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आले. यावेळी नगर तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, जगन्नाथ बर्डे, संकेत सोमवंशी, अमोल साळवे, भाऊसाहेब ठोकळ, बाळासाहेब बर्डे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
नगर तालुक्यासह जिल्ह्यात शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी जनावरे पाहुण्यांकडे सोडण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जिल्ह्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्याचे भान पालकमंत्री शिंदे यांना राहिल्याचे दिसत नाही. शेतकर्‍यांच्या जीवावर निवडून आलेले व मंत्री झालेले शिंदे यांनी दुष्काळावर उपाययोजना करण्याऐवजी या वक्तव्याने शेतकर्‍यांची चेष्टा केली असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. 
या दुष्काळात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांच्या हाताला काम नाही. शेतकर्‍यांविषयी त्यांना आदर नसल्याने अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री शिंदे यांनी केले आहे. त्यांनी तातडीने शेतकर्‍यांची माफी मागावी, नगर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांच्या चारा छावण्या सुरु करावे, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, पिक विम्याची आणेवारी 50 टक्केपेक्षा कमी करून जास्तीत जास्त पीक विमा मंजूर करावा व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, शेतकर्‍यांचे सोसायटी, बँकांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची मागणी नगर तालुका मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा नगर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने मनसेने दिला आहे.


अहमदनगर :
दुष्काळाच्या दाहकतेने शेतकरी होरपळत असताना व शेती मालाला भाव मिळत नसल्याने या प्रश्‍नावर उपाययोजना न करणार्‍या केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रीयतेचा निषेध म्हणून सत्ताधार्‍यांचा ब्रेन डेथ झाल्याचा गॅझेट पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने रविवार दि.16 डिसेंबर रोजी प्रसिध्द केला जाणार आहे. तर केंद्र व राज्य सरकारचे दोन प्रतिकात्मक दगड ठेऊन त्यांना कांदा हुंगवून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

ऐन दुष्काळात शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. केंद्र व राज्य सरकारला याचे गांभीर्य नसल्याने त्यांचे ब्रेन डेथ झाल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे कांद्याचे भाव कोसळले असताना उत्पादन खर्च निघणे देखील अवघड बनले आहे. तर दुष्काळात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांना कांद्यासाठी अनुदान व निर्यातीचे धोरण घेणे आवश्यक होते. दुष्काळावर उपाययोजना न करता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी पाहुण्यांकडे जनावरे घेऊन जाण्याचा अजब सल्ला दिलेल्या वक्तव्याचा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

सत्ताधार्‍यांची निष्क्रीयता व शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढणार असल्याची भिती संघटनेने व्यक्त केली आहे. या आंदोलनात कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.गवळी, जयाजी सुर्यवंशी, ज्ञानदेव काळे, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, शशीकांत चंगेडे, रफिक मुन्शी, प्रकाश थोरात, ज्ञानदेव काळे, हिराबाई ग्यानप्पा, शाहिर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदि सहभागी होणार आहे.

अहमदनगर :
अएसोच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील राहुल थोरात (खो-खो), तनिष्का गायकवाड व यश गायकवाड (स्केटिंग इनलाइन हॉकी) या तिन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

राहुल थोरात यांची बंगलोर (कर्नाटक) येथे होणार्‍या खो-खो च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तर निष्का गायकवाड व यश गायकवाड यांची विशाखापट्टणम येथे होणार्‍या ज्युनियर राष्ट्रीय स्केटिंग इनलाइन हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या गुणवंत खेळाडूंचा नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, कल्याणी फिरोदिया, सुनंदा भालेराव, मुख्याध्यापक उल्हास दुगड, खजिनदार प्रकाश गांधी, पर्यवेक्षक सुनील ख्रिस्ती, राजेंद्र बेद्रे, रवींद्र लोंढे, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष अशोक टकले यांनी अभिनंदन केले आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक रावसाहेब बाबर व कैलास साबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

अहमदनगर :
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत अहमदनगर जिल्‍हा केंद्रावर  राज्‍य निरीक्षक  प्रमाणित शाळा व संस्‍था/ रचना व कार्यपध्‍दती अधिकारी/ अधिव्‍याख्‍यात, जिल्‍हा व महिला बालविकास अधिकारी , अधीक्षक , सांख्यिकी अधिकारी गट-ब  चाळणी परीक्षा दिनांक 23 डिसेंबर 2018  सकाळी 10 ते दुपारी या वेळेत एकूण 13 उपकेंद्रावर घेण्‍यात येणार आहे. या परीक्षेसाठी  जिल्‍हा उपकेंद्रावर 4 हजार 607  उमदेवार परीक्षेस बसलेले आहेत.

परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्‍यासाठी समन्‍वय अधिकारी 3, भारारीपथक अधिकारी 1, उपकेंद्रप्रमुख 13 सहाय्यक 13, पर्यवेक्षक 45, सहाय्यक कर्मचारी 26, समन्‍वय अधिकारी व भरारी पथक यांचे सहायक 4,  समवेक्षक 192,  लिपीक 13, केअर टेकर (शाळेचे) 13, बेलमन 10, शिपाई 16,  पाणीवाटप कर्मचारी 45, वाहन चालक 18 या प्रमाणे अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

परीक्षेस बसलेल्‍या उमदेवारांना सकाळी 10 वाजता प्रवेश देण्‍यात येणार आहे. परीक्षेचे उत्‍तरे लिहिण्‍यासाठी  फक्‍त काळया शाईचे बॉल पॉईटपेन वापरणे तसेच उमेदवाराने डाव्‍या हाताच्‍या  अंगठयाचा ठसा हजेरीपटावर नोंदविणे आवश्‍यक आहे.  दोन ओळखपत्रांच्‍या छायाकिंत प्रती उमेदवाराने परीक्षेच्‍या वेळी सादर करावे.  मोबाईल, कॅल्‍क्‍युलेटर , डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन  इत्‍यादी सारखी  दूरसंचार  साधने परीक्षा केंद्राच्‍या परिसरात आणि परीक्षा दालनात  आणण्‍यास व स्‍वतःजवळ बाळगण्‍यास सक्‍त मनाई करण्‍यात आली आहे.  या सूचनेचे उल्‍लघंन करणा-या  उमेदवारास प्रस्‍तुत परीक्षेस तसेच त्‍यापुढील  आयोगाच्‍या इतर सर्व परीक्षांसाठी कायमस्‍वरुपी प्रतिरोधीत करण्‍यात येणार आहे.

कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या दृष्‍टीने  उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात येणार आहे.  तसेच परीक्षा उपकेंद्राच्‍या  100 मीटर परीसारातील एसटीडी बुथ,फॅक्‍स , झेरॉक्‍स , दुकाने बंद ठेवणेकामी परीक्षेच्‍या  दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत  परीक्षा क्षेत्रामध्‍ये सीआरपीसी 1973 चे कलम 144(3) लागू करण्‍यात आलेले आहे.  प्रस्‍तुत परीक्षेची  प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्‍वतः च आयोगाच्‍या वेबर्साटवरुन डाऊनलोड करुन घ्‍यावयाची आहेत.  दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्‍हाधिकारी कार्यालयामधून देण्‍यात येणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्‍यावी असे महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्‍हाधिकारी  प्रशांत पाटील यांनी  एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.

अहमदनगर :
जिल्‍हयातील ज्‍या नागरिकांनी पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी तसेच शेती किंवा अन्‍य वापरासाठी विंधन विहरी/ कूपनलिका खोदलेले आहेत. त्‍यापैकी अयशस्‍वी व वापरात नसलेल्‍या विंधन विहरी/ कूपनलिका उघडया राहिल्‍यामुळे अपघात घडण्‍याची संभवना असते. असे अपघात टाळण्‍यासाठी प्रशासनाने दिलेल्‍या मार्गदर्शन सूचनांचे  पालन नागरिकांनी करावे.

नव्‍याने खणण्‍यात आलेल्‍या कूपनलिका, विंधन विहिरी  वापर होईपर्यत योग्‍य त्‍या आकाराचे झाकाणे लावून बंद करण्‍यात यावे. वापरता नसलेल्‍या कूपनलिका, विंधन विहिरी मधून केसींग पाईप काढण्‍यात येऊ नये. अपघात टाळण्‍यासाठी  त्‍यामधील केसिंग पाईप जमिनीपासून 0.5 मीटर वर काढण्‍यात यावे.  तसेच कूपनलिका, विंधन विहिरी मधील केसिंग पाईप कोणत्‍याही कारणास्‍तव काढल्‍यास  त्‍यातील  खड्डयामध्‍ये  वाळू व दगडगोटे भरुन कोणतीही पोकळी राहणार नाही अशा पध्‍दतीने सिमेंट कॉक्रिटने बुजविण्‍याची दक्षता संबधित मालकाने घ्‍यावी.  कुपनलिका,विंधन विहिरीवरील पंपींग यंत्रसामग्री देखभाल व दुरुस्‍तीकरीता काढल्‍यास त्‍यावर योग्‍य आकाराचे झाकण लावून कुपनलिका, विंधन विहीरी बंद करण्‍यात यावेत. नव्‍याने घेण्‍यात आलेल्‍या अयशस्‍वी कुपनलिका, विंधन विहीरीवर अपघात घडल्‍यास संबंधीत मालकाला जबाबदार धरण्‍यात  येईल.

विधन विहिरी, कुपनलिका उघडया राहिल्‍यामुळे घडणा-या  दुर्घटना अक्षम्‍य  हलगर्जीपणा, दूर्लक्ष इ. कारणांमुळे होऊ शकतात. अशा कुपनलिका, विंधन विहिरीमुळे दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांनी जागरुक व सावध असणे आवश्‍यक आहे. आपले परिसरात अशा धोकादायक विहिरी कुपनलिका  आढळून आल्‍यास संबंधीत तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायत  यांचेशी संपर्क साधून त्‍यांच्‍या निदर्शनास आणून द्यावेत व  आवश्‍यकता वाटल्‍यास ग्रामसभा, विभागसभा याद्वारे प्रभावी अंमलबजावणी करावी.  नागरिकांनी स्‍वतः पुढे येऊन  स्‍वतःकडील धोकादायक होऊ शकणा-या कुपनलिका/ विंधन विहिरीसाठी संरक्षक उपाययोजना कराव्‍यात व प्रशासनास योग्‍य ते सहकार्य करावे, असे  निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकारणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी  प्रशांत पाटील यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे. 


पुणे :
पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजपने जोरदार आपटी खाल्ली आहे. तोच धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांना तडा देणारे कार्टुन प्रसिद्ध केले आहे.

मोदी व शाह यांच्यासह भाजपच्या प्रतिमेला या निवडणुकीत खऱ्या अर्थाने तडा गेला आहे. अहंकार वाढल्याने पक्षाचा हा पराभव झाल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे.मुंबई :
उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती केली आहे. दास हे आरबीआयचे २५ वे गव्हर्नर असतील. आर्थिक व्यवहार सचिव म्हणून ते दीड वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. ते सध्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत.
आरबीआय आणि अर्थ मंत्रालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आरबीआयचे गव्हर्नरपद रिक्त झाले होते. वाढत्या एनपीएच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आरबीआयवर निशाणा साधला होता. त्यामुळे पटेल अडचणीत सापडले होते.


मुंबई :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीने काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने जान  आली असतानाच भाजप या सत्ताधारी पक्षाचे त्राण हरपले आहेत. धक्कादायक निकालाने हा पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सैरभैर झाले आहेत. त्याचवेळी शिवसेना या महाराष्ट्रीयन पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.

विधानसभा निवडणूक निकालाने काँग्रेस, इतर मित्रपक्ष व शिवसेना यांच्यासह लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना अच्छे दिन आले आहेत. भाजप आतापर्यंत मित्रपक्षांना सापत्न वागणूक देत होता. मात्र, या निकालाने ५० वर्षे सत्तेसह काँग्रेसमुक्त भारत याचेही स्वप्न भाजपचे स्वप्न भंगले आहे. आता त्यामुळेच शिवसेना कोणता स्टॅन्ड घेणार याकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे.

मुंबई :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेस पक्षासह देशभरातील सर्वच राजकीय पक्ष चेतवले आहेत. भाजपच्या लोकशाही आघाडीतील काही पक्ष या निकालाने सैरभैर झाले आहेत. शिवसेना पक्षाची यामुळे बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. तर, देशभरातील प्रादेशिक पक्ष नव्या पर्यायावर विचार करण्यास यामुळे तयार होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

पुढील किमान ५० वर्षे भाजपची सत्ता देशभरात राहण्याचा आत्मविश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अनेकदा व्यक्त केला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व राज्यांतील निवडणुकात काही अपवाद वगळता भाजपला अभूतपूर्व यश मिळत होते. त्यामुळे इतर राजकीय पक्ष अस्थिर होते. अशा अस्थिर विरोधी पक्षांसह शिवसेनेसारख्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर या निकालामुळे वाढली आहे.

भोपाळ :
पाच राज्यांतील निवडणुकीने काँग्रेस आणि या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार कमबॅक केले आहे. मात्र, मध्यप्रदेश या राज्यात एकूण निकाल पाहता अपक्ष, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी व गोंडवाना गणतंत्र पार्टी यांच्या आमदारांचा भाव वधारणार आहे. अशावेळी भाजप पुन्हा एकदा गोवा राज्यातील खेळीचा उपयोग करून मध्यप्रदेश राज्यात सत्ता स्थापन करण्यात आघाडी घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी सर्व तंत्र वापरावे लागतात. त्यात भाजप आघाडीवर राहिला आहे. आताही मध्यप्रदेश राज्यात १२ तास मतमोजणी होऊनही नेमका निकाल जाहीर करण्यात निवडणूक आयोग यशस्वी ठरलेला नाही. या राज्यात काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष १११ यावर लटकले आहेत. ११६ हा सत्तेचा जादुई आकडा यापैकी कोणाला सापडणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र, अशीच स्थिती राहिल्यास एमपी राज्यात गोवा टाईप फ्रीस्टाईल रंगणार असल्याचीच चर्चा आहे.

भोपाळ :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. मात्र, तरीही मध्यप्रदेश या मोठ्या राज्यात पुन्हा एकदा भाजप हाच पक्ष सत्तेत राहणार असल्याचे चित्र आहे. १२ तास उलटूनही येथील मतमोजणी सुरु असून त्यात अखेरच्या टप्प्यात धक्कादायक पद्धतीने भाजपने आघाडी घेतली आहे.

सध्याच्या निकालानुसार या राज्यातील फक्त ४५ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपला २१ तर काँग्रेस पक्षाला २३ जागांवर विजय मिळाला आहे. मात्र, निकालाचे कल लक्षात घेता काँग्रेस:भाजप १११:१११ अशा एकाच टायब्रेकरवर अडकले आहेत. तसेच ४ अपक्ष जिंकण्याच्या मार्गावर असून मायावतींच्या बसप पक्षाला २ जागांवर आघाडी आहे. निकाल असा काठावर लागल्यास भाजप गोवा स्टाईलने येथील सत्ता ताब्यात घेण्यात सहजपणे यशस्वी होईल. अशावेळी या राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता पाच वर्षे टिकेल.

भोपाळ :
मध्यप्रदेश राज्यात विधानसभेचा निकाल कोणाच्या बाजूने झुकणार याबद्दल अजूनही कोणी ठोसपणे माहिती देऊ शकलेले नाही. १२ तास उलटूनही येथील निकाल जाहीर झालेले नाहीत. त्याचवेळी या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या राहात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही तुल्यबळ पक्षांना सारखेच टक्के मतदान झाले आहे.

राजस्थान या मोठ्या राज्यात ३ टक्के अधिक मतदानासह काँग्रेसने भाजपाची सत्ता खालसा केली आहे. मात्र, त्याचवेळी मध्यप्रदेश या राज्यात मात्र कांटे की टक्कर सुरु आहे. येथील निकालासही विक्रमी वेळ लागत आहे. सोशल मीडियावर हा चेष्टेचा विषय ठरलेला आहे. तसेच या राज्यात भाजपाला आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ४१.२ टक्के असे सारखेच परंतु फक्त ०.००९ टक्क्याच्या फरकाने मतदान मिळाले आहे.

भोपाळ :
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यासाठी लागलेला वेळ देशात संभ्रम निर्माण करणारा ठरला आहे. संगणकाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जोडून असे निकाल तातडीने जाहीर होणे अपेक्षित असतानाही, सकाळी ८ पासून १२ तासानंतरही निकाल जाहीर करण्यात निवडणूक आयोगास अपयश येत असल्याने सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने ईव्हीएम पुन्हा एकदा टिंगलीचा विषय बनला आहे.

मध्यप्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, मोझोराम, तेलंगणा या राज्यांत विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र, इतर राज्यांचे निकाल जाहीर केले जात असतानाच हिंदी पट्ट्यातील निकाल जाहीर होण्यासाठी मोठा वेळ लागला आहे. त्यातही मध्यप्रदेश येथील निकालाचा वेग सर्वांना गोंधळात टाकणारा ठरला आहे. डिजिटल युगातही मतमोजणीचा वेग मतपत्रिका असल्यासारखा असल्याने हा टिंगलीचा विषय ठरला आहे.नगर प्रेस क्लबचे कलेक्टरांना निवेदन: खातेनिहाय चौकशीची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी) :
महापालिका निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी नगर टाइम्सचे संपादक संदीप रोडे यांना मारहाण करणारे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी नगर शहर प्रेस क्लबने कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्याकडे आज केली. एसपी रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कलेक्टरांनी दिले.

महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी (रविवारी दि.9) संदीप रोडे यांना प्रभाग 1 मधील ज्ञानसंपदा स्कुलमधील बूथवर पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी व त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी काठीने मारहाण केली होती. रोडे हे पत्रकार असल्याने वार्तांकन करण्यासोबतच स्वत:चे मतदान करण्याकरीता तेथे गेले होते. पत्रकार असल्याचे सांगूनही मानगावकर यांनी ऐकले नाही, तसेच विनाकारण पोलीस कोठडीत डांबून ठेवले होते. हा प्रकार नगर प्रेस क्ल्बने आज कलेक्टरांच्या निदर्शनास आणून दिला. प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ‘सार्वमत’चे संपादक अनंत पाटील, आणि ‘नवा मराठा’चे संपादक ललित गुंदेचा,‘समाचार’चे संपादक महेंद्र कुलकर्णी यांनी मानगावकर यांच्या चुकीच्या वर्तनाची तसेच त्यांच्या पूर्वइतिहासाची माहिती कलेक्टरांना दिली. मानगावकर यांचा नगरमधील पत्रकारांविषयी पूर्वग्रहदुषित असल्याने ते इतर पत्रकारांवर आपला रोष व्यक्त करतील. त्यांची नगर जिल्ह्यातील कारकिर्द ही वादग्रस्त असल्याने त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी केली. कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात एसपी शर्मा यांच्याशी चर्चा करू. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वास न दिले.

‘सकाळ’चे कार्यकारी संपादक बाळ.ज.बोठे पाटील, विठ्ठल लांडगे, सूर्यकांत नेटके, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, सचिव मुरलीधर कराळे, अशोक झोटीग, गणेश शेंडगे, बंडू पवार, संपादक सुभाष चिंधे, सुभाष मुदळ, दत्ता इंगळे, निशांत दातीर, ज्येष्ठ पत्रकार मीनाताई मुनोत, सरवर तांबटकर, साजीद शेख, वाजीद शेख, राजू खरपुडे, बाबा ढाकणे, रमेश देशपांडे, सुशील थोरात, रोहित वाळके, शब्बीर शेख, सचिन शिंदे, राजेंद्र येंडे, अमित आवारी, दौलत झावरे, सागर शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

.................................

गांजा प्रकरणाचा रोष पत्रकारावर काढला

मानगावकर हे तोफखाना पोलीस ठाण्यात प्रभारी असताना नगर शहरात कोट्यवधी रुपयांचा गांजा तस्करी रॅकेट पोलिसांनी पकडले. त्यात मानगावकर यांचे ‘हात ओले’ झाले. त्यावर नगरच्या मिडियाने आवाज उठविला. त्यामुळं मानगावकर यांची चौकशी झाली अन् त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. आता ते कोपरगाव येथे प्रभारी म्हणून कार्यरत आहे. मात्र नगर शहरात पत्रकारांमुळेच निलंबन झाले असा समज करून घेत त्यांनी तो राग पत्रकारांवर काढण्यास सुरूवात केली आहे. आज रोडे झाले उद्या दुसर्‍या कोणावर ते राग काढतील, त्यामुळंच त्यांनी जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी कलेक्टर द्विवेदी यांच्याकडे केली.  


'एक गाव एक सामुदायिक विवाह' ही संकल्पना राज्याला नवी दिशा देणारी

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय अभ्यासक अभिनंदन थोरात यांचे मत.

अहमदनगर (प्रतिनिधी) :
माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू होत असलेली 'एक गाव एक सामुदायिक विवाह' ही संकल्पना राज्याला नवी दिशा देणारी आहे. ही सामाजिक चळवळ उभी राहिल्याने सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर वर्गाला त्यामुळे दिलासा मिळेल. त्यामुळेच सर्वांनी या संकल्पनेला सहकार्य करण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व राजकीय अभ्यासक अभिनंदन थोरात यांनी केले.

या जनजागृती अभियानाचा शुभारंभ सोमवारी (दि. 10 डिसेंबर) अहमदनगर येथे अभिनंदन थोरात आणि प्रथितयश कृषी उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी यामागील संकल्पनेची माहिती देताना नितीन उदमले म्हणाले की, मुलींच्या लग्नासाठी कोणतीही बँक, पतसंस्था कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी-शेतमजूर वर्गाला यासाठी खाजगी सावकारकाकडून जास्त व्याजाने जमिनी गहाण ठेऊन कर्जे घ्यावी लागतात. पुढे याच अवास्तव व्याजाचे कर्ज फेडताना त्यांच्यावर अनेकदा आत्महत्या करण्याची वेळ येते. शेतकरी आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे समाजाची प्रतिष्ठेची कल्पना लग्नसमारंभाशी जोडण्याऐवजी समाजातील प्रतिष्ठित अशा मोठ्या वर्गाने सामुदायिक विवाहाच्या संकल्पनेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. कारण समाजातील गरीब वर्ग स्वतः हे करू शकणार नाही. यावर्षीची दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने हा धोका खूपच अधिक आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांच्याच गावात 'एक गाव एक सामुदायिक विवाह' या संकल्पनेचा स्वीकार करावा. ही संकल्पना राज्यभर घेऊन जाण्यासाठी राज्यातील सर्व सरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार आणि सामाजिक संस्थांना पुढील महिन्याभरात संपर्क करणार आहे. इतर सर्वांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून या संकल्पनेचा अधिकाधिक प्रसार करावा, अशी विनंती उदमले यांनी केली आहे.

उद्घाटनपर मार्गदर्शनात प्रभाकर शिंदे म्हणाले की, समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीचा वापर चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. आताच्या दुष्काळी परिस्थितीत लोकांना ही संकल्पना समजावून सांगितली तर, ते ती नक्कीच स्वीकारतील. गुजरातमधील भुज परिसरात एका गावात सुरु झालेली अशीच एक  चळवळ आज हजारो गावात पोहोचली आहे.
उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात हि पोहचेल . माझ्या कामाच्या निम्मिताने 20 राज्ये आणि जवळजवळ  1000 गावांमध्ये आमचा संपर्क येतो त्या सर्व ठिकाणी आम्ही हि चळवळ पोहचवू.

उदघाटनपर बीजभाषणात अभिनंदन थोरात म्हणाले की, माझ्या २५ वर्षाच्या सामाजिक जीवनात शेतकरी आत्महत्या या विषयावर अनेक लोकांनी मोठे संशोधन केले. अनेक अहवाल सरकारला सादर केले. अनेक सरकारांनी त्यावर उपाय योजना करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरकारच्या मदती शिवाय प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून लोकसहभागातून या प्रश्नावर काम करण्याची संकल्पना व नियोजन नितीन उदमले यांनी केले आहे. प्रत्येक नागरिकामध्ये समाजाप्रती व शेतकऱ्यांप्रती काहीतरी करण्याची भावना असते. तिला प्रत्यक्षात कृतीकार्यक्रमाची जोड यानिमित्ताने मिळाली आहे. माध्यमे व समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून ही संकल्पना समाजात रुजविली व राबविली पाहिजे. सामुदायिक विवाह ही संकल्पना काही नवीन नाही. पण गाव हा घटक धरुन प्रत्येक गावात एक सामुदायिक विवाह व्हावा आणि तोही ग्रामस्थांनी स्वतः करावा हा संकल्प नवीन आहे. महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणारी ही संकल्पना आहे. अहमदनगर जिल्हा अनेक नवीन संकल्पनांचा उद्गाता आहे. राळेगण सिद्धीत अनेक वर्षांपासून सामुदायिक विवाह होतो. आता तो प्रत्येक गावात झाला पाहिजे. यासाठी तरुण पिढी पुढे आली याचे मला समाधान वाटते. नुसता प्रश्न कळून उपयोग नसतो तर, प्रत्यक्षात त्यासाठी ग्राउंडवर उपाय सुचविणे आणि तो अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेणे महत्वाचे असते.

शेतकरी नेते अॅड. सतीश पालवे म्हणाले की, या संकल्पनेमुळे नितीन उदमले यांनी शेतकऱ्यांच्या थेट काळजाला हात घातला आहे. खऱ्या समस्येवर अचूक बोट ठेवले आहे.
याप्रसंगी 'एक गाव एक सामुदायिक विवाह' संकल्पनेच्या मानचिन्हाचे अनावरण करण्यात आले. सुत्रसंचालन अमोल बागुल व आभार प्रदर्शन अजित रोकडे यांनी केले.

क :
येथे दक्षिण आशियाई देशांची दुष्काळ निवारण परिषद दि. ०९ डिसेंबर रोजी सुरु झाली. सदर परिषदेत भारताच्या वतीने मा.श्री.पोपटराव पवार, कार्याध्यक्ष आदर्शगाव योजना तथा सरपंच हिवरे बाजार बोलत होते. या परिषदेचे उदघाटन महामहीम श्री.नझमुल क्वीन्नी,बांग्लादेश राजदूतयांच्या हस्ते झाले, या प्रसंगी सरदार मोहसीन खान लेहघरी मंत्री जलसंधारण पंजाब, सी.एम. सफी सामी परराष्ट्र मंत्री सचिव बांग्लादेश, इक्वार मोहम्मद नमी संचालक जल व भूमी विभाग अफगाणिस्तान,बृशा निशांत प्रकल्प संचालक जागतिक बँक आशिया, गंसा कर्मा छोपेल जलतज्ञ भूतान पाणी परिषद, चिंग झायटोसंचालक पाण्याचे दुष्परिणाम चीन, माधव बेलबसे उपसचिव पाणी व उर्जा विभाग नेपाळ,सय्यद नसीर अहमद मुख्य सचिव जल व वित्त विभाग पाकिस्तान  तसेच या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वर्ल्ड बँकेने केले होते. श्री.पवार यांनी हिवरे बाजारच्या दुष्काळ निवारणाची यशोगाथा तसेच आदर्शगाव योजनेतून दुष्काळमुक्त झालेल्या गावांबद्दल, जलयुक्त शिवार, पाणी फौंडेशन द्वारे दुष्काळ हटलेल्या गावांची माहिती सादरीकरणाद्वारे परिषदेत मांडली.

श्री.पवार पुढे बोलताना म्हणाले पडणा-या प्रत्येक पावसाचा आदर करून थेंब न थेंब जमिनीत मुरवला पाहिजे. जलसंधारण व मृदसंधारणाच्या गुणवत्ता पूर्ण कामा बरोबरच पाण्याचा ताळेबंद करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पाण्याच्या ताळेबंदाबरोबरच पिक नियोजन ही महत्त्वाचे आहे तरच दुष्काळावर मात करणे शक्य होईल. या सा-या गोष्टी हिवरे बाजामध्ये केल्या आहेत. हिवरे बाजारच्या धर्तीवर आदर्शगाव योजनेतून एकूण १०० गावे दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून २२०० गावात जल व मृद संधारणाचे मोठे काम झालेले आहे. त्यामुळे या गावातला दुष्काळ भयंकर रूप धारण करू शकला नाही. मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच कार्पोरेट कंपन्यांच्या सहयोगातून १००० गावात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. तसेच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमीर खान यांच्या सत्यमेव जयते पाणी फौंडेशन वाटर कपची चळवळ महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त ७००० खेड्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरयांनीसुद्धा दुष्काळ मुक्ती व ग्रामविकासाचे काम सुरु केलेले आहे.

प्रत्येक कामात गावक-यांचा सहभाग आणि सक्रियतेची गरज आहे. भविष्यात शेतीसाठी १२ महिने पाणी उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे भारतासह आशियातील दुष्काळग्रस्त प्रदेशात आठमाही पिकाचे नियोजन व व्यवस्थापन करण्याकडे शेतक-यांना प्रेरित केले पाहिजे. भूपृष्टावर जलसंचय करण्याबरोबरच भूगर्भात जलपुनर्भरण करण्याची गरज अतिशय महत्त्वाची आहे. सध्या शहरांकडे लोक स्थलांतर करत आहेत त्यामुळे शहरांची लोकसंख्या वाढत असून पाण्याचा अतिरेकी वापर शहरात होत आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यावरून पुढील २५ वर्षात शहरे आणि खेडी यांच्यात संघर्ष निर्माण होणार आहे. शेती धोक्यात आली तर अन्न – धान्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे. शालेय जीवनापासूनच मुलांच्या मनावर जलसाक्षरता व पिक साक्षरता संस्कार रुजविण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय पाठ्य पुस्तकात जलसाक्षरता व पिक साक्षराता यांचे महत्त्व प्रतिपादन करणा-या अभ्यासक्रमाचा समावेश असावा. सगळ्या राजकीय व्यवस्थेने एकत्र येवून मतपेटी डोळ्यासमोर न ठेवता व गुत्तेदारी डोळ्यासमोर न ठेवता भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेतले पाहिजे. म्हणूनच हिवरे बाजाराच्या अनुभवातून एकात्मिक ग्रामिण विकास संकल्पना हीच भविष्यात उपयोगी पडू शकते. पोपटराव पवार यांच्या सादरीकरणानंतर संपूर्ण सभागृहाने उभे राहून पवार यांच्या भाषणाला दाद दिली.


महाराष्ट्रातील समस्त भारतीय नागरिकांनो, नमस्कार...

आज एका अतिशय किरकोळ घटनेमुळे आपल्याशी संवाद साधण्याची गरज वाटली. हे वाचून काहीजण शिव्या-शाप देतील, तर काहीजण त्याच्याही पुढे जाऊन निषेध करतील. काहीजण तर कदाचित हल्लाही करतील. कारण कोणत्याही गोष्टीचा निषेध करणे आणि झुंडीने एखाद्यावर हल्ला करणे हीच आपली संस्कृती आहे. आपल्याकडे माणूस आणि विचारांना तसेही नगण्यच स्थान असते आणि यापुढेही राहील. मात्र, व्यक्तिप्रेम आणि व्यक्तीद्वेष याचे फळ म्हणजेच सध्याचे भारतीय राजकारण...

(कृपया लेख पूर्ण वाचूनच मला काय बोल लावायचेत ते लावावेत, ही विनंती)

प्रथम मला प्रश्न पडलाय की, अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या माजी महापौर श्रीपाद छिंदम याचे जाहीर अभिनंदन करावेच की नाही? कारण, जसे इतर सगळे नगरसेवक निवडून आल्यावर अभिनंदन करण्यास आणि स्वीकारण्यास पात्र असतात तसेच तोही अभिनंदनास पात्र असायला हवा. मात्र, तसे करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान होईल, म्हणून ते गैरकृत्य मी करणार नाही. मात्र, नगरमधील प्रभाग क्रमांक ९ च्या मतदारांनी त्याला विजयी कौल दिला आहे. म्हणून तो आता एका जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा बसणार आहे. राज्यभरातून जोरदार विरोध होत असताना, तडीपारीची शिक्षा भोगत असतानाही छिंदम याने मिळविलेले यश वाईट अर्थाने का होईना पण कौतुकास पात्र नाही का ठरत..?

तडीपार असूनही, वादग्रस्त असूनही छिंदम याचा विजयी होण्याचा आत्मविश्वास मला कमालीचा कौतुकास्पद वाटत होता. पण नगरच्या बालबुद्धी मतदारांनी त्याचा हाच आत्मविश्वास सार्थ ठरविताना माझ्यासारख्या निर्बुद्धांची निराशाही केली. इथे नगर शहरात माझ्या काही मित्रांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढताना पराभवाची चव चाखली आहे. तर, काही मित्रांनी फक्त धार्मिक सोहळे व जातीयवादी गणित यांची सांगड घालून विजय मिळविला आहे. कोण जिंकला व कोण हरला, याचे वैयक्तिक उणेदुणे काढण्याचा विचार नाही. पण शिवसेना असोत की भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस आणि इतर पक्ष. या सर्वांच्या विजयी उमेदवारांत अशा धार्मिक आणि जातीचा आसरा घेऊन विजयी झालेलेच बहुसंख्य आहेत. तर, विकास या मुद्यावर विजयी झालेले फक्त बोटावर मोजण्याइतके. छिंदम याचा विजयही याच चौकटीतला. मतदान केंद्रावर जाऊन भटजींच्या मदतीने पूजा करून घेण्याचा 'विकासवादी' विचार श्रीकांत छिंदम यांनी केला होताच की. आपल्या भावासाठीचा हाच प्रयत्न आता गुन्ह्याच्या चौकटीत अडकलाय. आणि दैव बलवत्तर ठरल्याने छिंदम याच्यासारख्याचा दणदणीत मतांनी विजयही झालाय. घासून नाही तर तो ठासून आलाय...

मध्ययुगात धार्मिक कर्मकांडात अडकलेल्या समाजाला वाट दाखविण्यासाठी एकेकाळी ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्यासह अनेक संतांनी आपले जीवन सार्थकी लावले. मात्र, आता त्यांच्याच विचारांना दैववादी मुलामा लावून बहुसंख्य कीर्तनकार समाजाला वेगळा 'पाठ' पढवीत आहेत की. नगर शहरात असोत की धुळे आणि महाराष्ट्राच्या इतर शहरांत असोत. धार्मिक सोहळ्यातून संतांचे विचार हद्दपार झाले आहेत. नव्हे जाणीवपूर्वक असे विचार हद्दपार करून टाकले आहेत. आधुनिक समाजात ज्ञानेश्वर आणि तुकाराम फक्त पाया आणि कळस या शब्दांसाठी उरले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामित्वाची झूल घेऊन जातीयवादी व धर्मांध विचार रुबाजविणाऱ्यांचे हे पातक आहे. एकदा विचार संपून धर्म किंवा जातीची झुंड पुढे आली की माणुसकीही संपते. म्हणूनच आता पाळीव प्राणी माता बनली असताना आपल्या समाजातून माणूसपण हद्दपार झाले आहे.

नगर शहरही याच मानसिकतेत गुरफटले आहे. एकेकाळी ज्ञानेश्वरीद्वारे समाजाला समतेचा आणि ज्ञानवादी दृष्टिकोन देण्याचे काम माझ्या नगर जिल्ह्याने केले. पण, मित्रांनो आज हाच जिल्हा धार्मिक आणि जातीयवादी विचारांत गुरफटून गेला आहे. कर्मकांड आणि भाटगिरी या बोगस (अ)विचारांत नगरकर मग्न आहेत. शिवाजी महाराजांनी एकेकाळी समाजाच्या अन्यायाला वाचा फोडून रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला. त्यांनी सामान्य जनतेला न्याय देण्याच्या विचाराने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. पण त्याचा आम्हाला विसर पडला. आम्ही त्यांनाही जातीबंद केले. इथेच आपण चुकलो रे. त्याच चुकीची शिक्षा म्हणून आपण समाजकारण विसरून धार्मिक व जातीयवादी राजकारण्यांचे गुलाम बनलो.

छिंदम निवडून आला याचे काहीच वाईट नाही. कारण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या किमान ८० टक्के लोकप्रतिनिधी असेच झुंडीचे नेते म्हणून निवडले जात आहेत. तेही बेताल बोलतात. फक्त अजून त्यांची बेतालगिरी जगजाहीर झालेली नाही. इतकाच काय तो फरक. मात्र, तरीही मुद्दा उरतो तो अशा मंडळींच्या कोडगेपणाचा. आपली चूक झाली आहे, असे न वाटून घेत ही मंडळी राजरोस पुढारी म्हणून मिरवतात. समाजही त्यांची ही मिजास खपवून घेतो. इथे खऱ्या अर्थाने चुकतोय तो समाज. कारण, लोकशाहीत मतदारांच्या लायकीनुसार पुढारी निवडले जातात. इथे समाज अविचारी असल्यावर पुढारी कसे विचारी असतील किंवा निवडले जातील? उलट लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेला खुनी असोत की दंगलखोर, तोच 'पावन' करून घेण्याची आपली संस्कृती आहे. वाल्याचे वाल्मिकी होतातच की. आताही आघाडीतले बहुसंख्य वाल्या भाजपत जाऊन वाल्मिकी होत आहेत आणि यापुढेही होतील. कारण, भारतीय जनता अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत गुरफटली आहे. नव्हे, तिने त्याच काळात मनाने जाऊन झोपल्याचे सोंग घेतले आहे.

छत्रपती शिवरायांना एका कप्प्यात बंद करणारे आपणच आणि त्यांच्या विचारांचा खून करणारेही आपणच. इथे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या छिंदम याचा काहीच रोल नाही. कारण, मग छिंदम याच्या जातीनेही आपली झुंड केली. ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. मराठा म्हणून किंवा ओबीसी, दलित किंवा इतर समाज म्हणून किंवा जातीचे व धर्माचे उपघटक म्हणून कोणीही एक झाल्यास दुसरेही एक होणारच की. याचा काहींना राग येईल. ते मलाही 'बाटगा' ठरवतील. पण हरकत नाही. आज खरे बोलण्याची गरज आहे. कारण आज मी किंवा इतर कोणीही खरे न बोलल्यास भारतातील या महाराष्ट्र नावाच्या महान राज्याचा इतिहास वेगळा असेल. छत्रपती शिवाजी महाराज हे काही फक्त मोठे राजे नव्हते. तो एक जिवंत विचार होता. सामाजिक जागृतीचा आणि अन्यायाला वाचा फोडण्याचा. तोच विचार आपण विसरलो. ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांनी दिलेला समतेचा आणि माणुसकी धर्माचा विचार आपण विसरलो. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. जातीव्यवस्था ही तत्कालीन समाजाची गरज होती आणि मनुस्मृती ही फक्त आता जाळण्यासाठी उरलेली आहे. याचेच भान आपण सगळे हरपून बसलोय.

...की जय..! म्हणण्याच्या नादात आपण एखाद्याला दुखविता आहोत. मग त्यांचीही झुंड बनेल आणि आणखी अविचार करील, याचे भान आपण ठेवायला हवे. छिंदम याचा विजय लोकशाही मार्गाने झाला आहे. लोकशाही ही एक मध्यममार्गी व उत्तम व्यवस्था आहेच. मात्र, या लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी विचारी व समंजस समाजाचीही तितकीच गरज आहे. सामाजिक समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांचा विसर आपण पडू देऊ नका. स्वातंत्र्य आणि स्वैराचार याची सीमारेषा सांभाळा. विचारी व जगाला सकारात्मक दिशा देणारा 'विश्वात्मके देवे' असा संदेश मनात ठेऊन या असामाजिक विचारांच्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी गरज आहे ज्ञानेश्वर-तुकारामांच्या विचारांची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या ठोस विचारी कृतीची...

- सचिन मोहन चोभे
अहमदनगर (महाराष्ट्र)

*(कोणाच्याही भावना दुखावले असे लिखाण असल्याचे वाटल्यास कळवा. त्यानुसार त्यात बदल केला जाईल. कारण, शेवटी जनता आणि तिचा विचार महत्वाचा. मग तो लेखकाला पटो अथवा न पटो...)

अहमदनगर :
नगर तालुक्यातील निंबोडी येथे चंपाषष्ठी खंडोबा यात्रा उत्सव निमित्त शुक्रवार दि.14 डिसेंबर रोजी कुस्ती हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त मातीतल्या कुस्तीचा थरार रंगणार असून, या कुस्ती हगाम्यात जिल्ह्यातील मल्लांना सहभागी होण्याचे आवाहन निंबोडी ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. 

निबोडी येथे यात्रे निमित्त भरविण्यात येणारा कुस्ती हगामा नगर तालुक्यासह जिल्ह्याचे खास आकर्षण आहे. दरवर्षी जिल्ह्यातील नामवंत मल्लांसह लष्करातील जवान देखील या कुस्ती हगाम्यात सहभागी होत असतात. तसेच जागृक देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मंदिरात दर्शनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी असते. या हगाम्यात शेवटच्या मानाच्या कुस्तीसाठी चांदीची गदा बक्षिस ठेवण्यात आले आहे. तसेच विजयी मल्लांना रोख स्वरुपात बक्षिसे दिले जाणार आहेत. शुक्रवारी दु.11 ते 1 या वेळेत मल्लांच्या कुस्त्या जोडल्या जाणार असून, दुपारी 3 नंतर कुस्ती हगाम्यास प्रारंभ होणार आहे. वजन गटानुसार कुस्त्यांचे मैदान गाजणार असून, वजन दिल्याशिवाय मल्लाची कुस्ती लावली जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.   
खंडोबा यात्रे निमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि.13 डिसेंबरला जेजुरी येथून आलेल्या मशालचे (ज्योत) गावात जंगी स्वागत केले जाणार आहे. तर सायंकाळी गावात छबीना मिरवणुक काढण्यात येणार आहे. रात्री रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम रंगणार आहे. शुक्रवार दि.14 डिसेंबरला सकाळी किर्तनाचा कार्यक्रम होणार असून, संध्याकाळी कुस्ती हगाम्याने यात्रा उत्सवाचा समारोप होणार आहे. कुस्ती हगाम्यात सहभागी होणार्‍या मल्लांनी 9881761515, 8087014929 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदनगर :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या 21 वी वरिष्ठ महिला व 3 री सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे उत्साहात पार पडली. नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील 198 महिला कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ह्रद्याचा ठोका चुकविणार्‍या कुस्तीच्या डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी निमगाव वाघाचे मैदान गाजविले. 

जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आंतराष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री फंड, स्पर्धेचे आयोजक तथा नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सरपंच सुमन डोंगरे, नवनाथ विद्यालयाचे प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, तालिम सेवा संघाचे उपाध्यक्ष काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, प्रा.संतोष भुजबळ, पोपट भुजबळ, जालिंदर आतकर, भागचंद जाधव, रमेश रोहोकले, प्रमोद गोडसे, शिवाजी ठाणगे, पै.संदिप डोंगरे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, दत्तात्रय जाधव, विठ्ठल वाबळे, किरण मोरे, विकास निकम, महेश शेळके, अंबादास जाधव, रामदास अडसुरे, उद्योजक दिलावर शेख, पै.वलीभाई शेख आदिंसह ग्रामस्थ व महिला कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे व प्रतिभा डोंगरे यांनी केले. प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी स्पर्धेची माहिती दिली. जपान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकाविणारी भाग्यश्री फंड हीचा निमगाव वाघा ग्रामस्थ व नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

माधवराव लामखडे म्हणाले की, महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. ऑलम्पिक मध्ये महिलांनी पदक पटकावून देशाची शान राखली. कुस्ती या खेळात पुरुषांची असलेली मक्तेदारी मोडीत काढत अनेक महिला कुस्तीपटू आंतराष्ट्रीय स्तरावर चमकत आहे. तर नगर सारख्या दुष्काळी जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू घडत असून, त्यांना दिशा व प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या निवड चाचणीत विजयी झालेल्या खेळाडू राणी जगताप (कर्जत), प्रतिभा डोंगरे (ता.नगर), प्रियंका डोंगरे (ता.नगर), शिवांजली पारखे (कर्जत), काजल ढाकणे (पाथर्डी), अलफिया शेख (ता.नगर), शिल्पा मत्रे (जामखेड), दिव्या शिलवंत (कर्जत), तैसिन शेख (नगर शहर), प्रतिक्षा परहर (कर्जत) यांची 21 वी वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तर अक्षदा रोहोकले (पारनेर), संगीता खरात (कर्जत), पुजा आवटी (नेवासा), सोनाली मंडलिक (कर्जत), धनश्री नवथर (नेवासा), भाग्यश्री फंड (श्रीगोंदा), साक्षी मावळे (पारनेर), सानिका पवार (नेवासा), भाग्यश्री इंगळे (ता.नगर), प्रतिक्षा ठाणगे (ता.नगर) या विजेत्या महिला कुस्तीपटूंची 3 री सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड चाचणी स्पर्धेस पंच म्हणून संभाजी निकाळजे, गणेश जाधव, समिर पटेल यांनी काम पाहिले. विजयी खेळाडूंना जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. 

शिर्डी:
बचतगटात सहभागी होऊन महिलांनी सक्रीय सहभाग नोंदविल्याने व बचतगट चांगल्या पद्धतीने चालविल्याने महिला सर्व कामात अग्रभागी आहे.  या कामामध्ये कायमस्वरूपी सातत्य ठेवल्यास विकास कामांना अधिक गती येईल असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांनी केले आहे

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे आयोजित केलेल्या क्रांती लोकसंचलीत साधन केंद्र अंतर्गत गावं विकास समिती संचलित  आर्थिक समावेशन प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या, यावेळी विभागीय संसाधन व्यक्ती संदीप मराठे, जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, सहा.जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल पैठणे, माजी पं.स.सदस्य बबन निकम, सरपंच,ग्रामसेवक cmrc अध्यक्ष श्रीमती उषा निकम, श्रीमती सोनाली शिंदे सविता रसाळ, अलका पंधोरे, रोहिणी दंडवते तसेच गावातील ग्रामस्त व महिलां बहुसंखेने उपस्थितीत होत्या.

आध्‍यक्ष श्रीमती ठाकरे म्हणाल्या, मला ग्रामीण भागातील महिलांना भेटायाचे आहे. बचतगटाने साथ दिली म्हणून आज महिला एकत्रितपणे रहात आहे.  त्यामुळे गरिबी, संकटंचा सामना, आर्थिक परीस्थितीवर मात करत आहे. बचतगटातून कर्ज घेऊन आता महिलांनी आपले उद्योग मोठ्याप्रमाणावर वाढ करून  बाजारपेठ मिळविली पाहिजे, आपला माल स्पर्धेत टिकला पाहिजे आणि अमेझॉन या सारख्या बाजारपेठेत नोंद झाली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.  या प्रसंगी अध्यक्षांच्या हस्ते बचत गटातील महिलांना मंजूर झालेल्या कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच बचत गटातून अर्थसाहय्य घेऊन महिलांनी सुरु केलेल्या झेरोक्स दुकान, किराणा दुकान, पिठाची गिरणी, गाव विकास समिती आदींचे फलक अनावरण करण्यात आले.

राहता तालुक्यातील अस्तगाव या गावातील बचत गटांना भेटी देण्यात आल्या या वेळी, स्रीशक्ती लोकसंचलीत साधन केंद्र राहता अंतर्गत आर्थिक समावेशन फलकाचे अनावरण केले तसेच गटातील महिलांना कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले.अस्तगाव येथे हि महिलांना  मार्गदशन केले या प्रसंगी  महिलांच्या बरोबर चर्चा करून माहितीव मार्गदशन  केले.  या वेळी गावाचे  सरपंच श्रीमती ज्योती त्रीभान यांनी सत्कार केला व बचत गटातील महिला सरपंच म्हणून निवड झालेल्या श्रीमती ज्योती त्रीभान यांचे स्वागत अध्यक्षांनी केले. महिलानी कर्ज घेऊन सुरु केलेल्या नर्सरी व रोप वाटिका, हॉटेल व बेकरी  व्यवसाय सुरु केलेल्या नाम फलकाचे अनावरण करून उधोयगाची पाहणी केली व महिलांचे कौतुक केले. या कार्यक्रमा करिता गावातील महिला मोठ्या संखेने उपस्थिती होत्या,

अध्यक्षा यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन बचत गटाच्या कामाबाबत चर्चा केली, तसेच बचत गटांच्या उद्योग व्यवसाय संबधी माहिती दिली. या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळ  अहमदनगर अंतर्गत  नेवासे येथील बचत गटातील महिलेने सुरु  केलेल्या तूप व्यवसायाची अमेझॉन मध्ये नोंद झाली याची माहिती देऊन एक सॅम्पल भेट देण्यात आले. तसेच हिवरे बाजार आदर्श गाव योजना राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची भेट घेऊन बचतगट व गाव विकास संदर्भात चर्चा केली. पोपटराव पवार यांची बँकॉक येथील जागतिक पाणी परिषदेकरिता निवड झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामस्तांच्या वतीने श्रीमती ठाकरे यांचाही सत्कार करण्यात. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक  श्रीमती सविता परदेशी  यांनी केले.  तर आभार प्रदर्शन श्रीमती  मंदाताई चौधरी यांनी मानले. 


शिवसेना-२४,  राकॉं-१८, भाजप-१४, कॉंग्रेस-५ तर बसपाला ४ जागा
अहमदनगर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठीची मतमोजणी आज शांततेत पार पडली. महापालिकेच्या 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेने 24, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 18, भारतीय जनता पक्षाने 14 जागा जिंकल्या. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 5, बहुजन समाज पक्षाने 4 तर अपक्षांनी 2 जागा जिंकल्या. एक जागा समाजवादी पक्षाने जिंकली. सकाळी १०  वाजता मतदानमोजणीस सुरुवात झाली. प्रत्येक प्रभागनिहाय मतमोजणी स्वतंत्रपणे सुरु असल्याने अतिशय शांततेने ही प्रक्रिया पार पडली.

मुख्य निवडणूक निरीक्षक राजीवकुमार मित्तल, निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपायुक्त (निवडणूक) सुनील पवार, सहाही निवडणूक निर्णय अधिकारी प्राजित नायर, उज्ज्वला गाडेकर, गोविंद दाणेज, जयश्री माळी, वामन कदम, शाहूराज मोरे आदींनी मतमोजणी प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे पार पाडली.

महापालिकेच्या 68 जागांच्या मतमोजणीचा तपशील आणि प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.
प्रभाग 1१- अ-अनुसुचित जाती- सागर बोरूडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - 4641, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री -मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571, क- सर्वसाधारण स्त्री राखीव- दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) - 6224. ड-सर्वसाधारण-संपत बारस्कर (राष्ट्रवादी) - 5896
प्रभाग 2-  अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग - विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी)-5236, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव-रुपाली वारे (काँग्रेस)- 5837, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- संध्या पवार (काँग्रेस)- 6072, ड- सर्वसाधारण-सुनील त्र्यंबके (राष्ट्रवादी)-5021,
प्रभाग 3-  अ- नागरिकांचा मागासप्रवर्ग- असिफ सुलतान (समाजवादी) -2329, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव- मिनाज खान जाफर(अपक्ष) -4026, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- रिझवाना शेख फारुक (काँग्रेस) -2243, ड-सर्वसाधारण-समद खान वहाब (राष्ट्रवादी) -3467
प्रभाग 4- अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री ज्योती गाडे (राष्ट्रवादी)-3751, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव- शोभा बोरकर (राष्ट्रवादी)- 3875, क-सर्वसाधारण- योगिराज गाडे (शिवसेना)- 3715, ड-सर्वसाधारण-स्वप्नील शिंदे (भाजप)- 2761
प्रभाग 5 - अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग-मनोज दुलम (भाजप) -5039, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री- सोनाबाई शिंदे (भाजप)- 4661, क- सर्वसाधारण स्त्री राखीव- आशा कराळे (भाजप)- 4573, ड-सर्वसाधारण- महेंद्र गंधे (भाजप)- 4801
प्रभाग 6- अ- अनुसूचित जमाती स्त्री राखीव- सारिका भुतकर (शिवसेना) -3780, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग-बाबासाहेब वाकळे (भाजप) -5029, क-सर्वसाधारण स्त्री राखीव-वंदना ताठे (भाजप) -3502, ड-सर्वसाधारण- रवींद्र बारस्कर (भाजप) -3343
प्रभाग 7- अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- रीता भाकरे (शिवसेना) -4353, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग-अशोक बडे (शिवसेना) -4716, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- कमल सप्रे (शिवसेना) -4295, ड-सर्वसाधारण- कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822
प्रभाग 8- अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- रोहिणी शेंडगे (शिवसेना)- 4662, ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- पुष्पा बोरूडे (शिवसेना)- 6641, क-सर्वसाधारण-सचिन शिंदे (शिवसेना)-4398, ड-सर्वसाधारण- शाम नळकांडे- 4379
प्रभाग 9 : अ- अनुसूचित जाती स्त्री राखीव- शीला चव्हाण(काँग्रेस) -3536, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव- मालन ढोणे (भाजप) -6124, क-सर्वसाधारण-श्रीपाद छिंदम (अपक्ष) -4532, ड-सर्वसाधारण- सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484
प्रभाग 10 : अ- अनुसूचित जाती- अक्षय उनावणे (बसपा) -3023, ब-नागरिकांचा मागासप्रवर्गस्त्री राखीव- अश्विनी जाधव (बसपा) -5810, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- अनिता पंजाबी (बसपा) -3332, ड-सर्वसाधारण-मुदस्सर शेख (बसपा) -5787
प्रभाग 11 -अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- रूपाली जोसेफ पारगे (राष्ट्रवादी)- 4442, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग- अविनाश घुले (राष्ट्रवादी)-4946, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- परवीन कुरेशी (राष्ट्रवादी)- 5069, ड-सर्वसाधारण- शेख नजिर अहमद अ. रज्जाक(राष्ट्रवादी)- 4495
प्रभाग 12 -अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग- बाळासाहेब बोराटे (शिवसेना)- 8254, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव -सुरेखा कदम (शिवसेना) - 6128, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- मंगल लोखंडे (शिवसेना)-4652, ड-सर्वसाधारण- दत्तात्रय कावरे (शिवसेना)-5604
प्रभाग 13- अ-नागरिकांचा मागासप्रवर्ग- गणेश कवडे (शिवसेना) -5658, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव-सोनाली चितळे (भाजप) -5463, क-सर्वसाधारण स्त्री राखीव-सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266, ड-सर्वसाधारण-सुभाष लोंढे (शिवसेना) -6306
प्रभाग 14- अ-नागरिका्ंचा मागासप्रवर्ग- प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416, ब-सर्वसाधारण स्त्री राखीव-शीतल जगताप (राष्ट्रवादी) - 5100, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534, ड-सर्वसाधारण-
गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348
प्रभाग 15- अ-अनुसूचित जाती- परसराम गायकवाड (शिवसेना) -3927, ब-नागरिका्ंचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव-सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096, क-सर्वसाधारण स्त्री राखीव- विद्या खैरे (शिवसेना) -3120, ड-सर्वसाधारण-अनिल शिंदे (शिवसेना) -2880
प्रभाग 16- अ-अनुसूचित जाती स्त्री राखीव- शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652, ब-नागरिका्ंचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव- सुनीता कोतकर (शिवसेना) -4548, क-सर्वसाधारण- विजय पठारे (शिवसेना) -5421, ड-सर्वसाधारण-ज्ञानेश्वर उर्फअमोल येवले (शिवसेना) -5082
प्रभाग 17- अ-अनुसूचित जाती- राहुल कांबळे (भाजप)-3981, ब-नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव- गौरी ननावरे (भाजप) -4399,  क-सर्वसाधारण स्त्री राखीव- लताबाई शेळके (भाजप) -3873, ड-सर्वसाधारण-मनोज कोतकर (भाजप) -5341

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget