DNA Live24 2015

9 डिसेबरला 68 जागांसाठी 337 केंद्रावर होणार मतदान

अहमदनगर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक रविवार दिनांक 09  डिसेंबर, 2018 रोजी मतदान होणार आहे.  या सार्वत्रिक निवडणूकीची  वेळ सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत आहे.  अहमदनगर शहरातील 17  प्रभागातील प्रत्‍येकी चार या प्रमाणे 68 जागांसाठी 337 मतदान केंद्रांवर मतदान  होणार आहे.

मतदारांनी मतदानास जाताना आपल्‍या ओळखीबाबतचे  भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक छायाचित्र मतदार ओळखपत्र (ईपीक),  वाहन परवाना, पारपत्र  (पासपोर्ट), राज्‍य शासनाने निर्गमित केलेले शासकीय नोकरदाराचे ओळखपत्र. बँक/पोस्‍टाचे छायाचित्र असलेले पासबूक. पॅन कार्ड. जनगणना (NPR)  स्‍मार्ट कार्ड. छायाचित्र असलेली पेन्‍शन कागदपत्रे. आधार कार्ड, पदवी, पदविका प्रमाणपत्र, शिधापत्रिका (फोटोसह दि.31.05.2018 पूर्वी निर्गमित केलेले), अ.जा., अ.ज., इ.मा.व. जात प्रमाणपत्र (फोटोसह दि.31.05.2018 पूर्वी निर्गमित केलेले), अपंग प्रमाणपत्र (फोटोसह दि.31.05.2018 पूर्वी निर्गमित केलेले), मालमत्‍ताबाबतची कागदपत्रे अथवा नोंदणीकृत दस्‍त फोटोसह, सेवानिवृत्‍त कर्मचा-यांचे बँक पासबूक ,रोजगार हमी योजनेचे देण्‍यात आलेले फोटोसहीत ओळखपत्र व  शस्‍त्र परवाना. यापैकी कोणतेही एक फोटो असलेले ओळखपत्र घेऊन मतदान करता येईल.

आपले नांव ज्‍या प्रभागाच्‍या मतदान यादीमध्‍ये आहे त्‍या प्रभागाचे मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचेकडून यादीतील अनुक्रमांक तात्‍काळ उपलब्‍ध होणे कामी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी ( बीएलओ) यांनी संबंधित मतदान केंद्रावर मतदानाच्‍या दिवशी उपस्थित राहण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. प्रत्‍येक मतदारास त्‍यांचे प्रभागात प्रभाग अ, ब, क आणि ड असे प्रत्‍येकी एक मत याप्रमाणे एकूण 4 मते देण्‍याचा अधिकार आहे. मतदान कक्षात बॅलेट युनिटवर वर्गवारीनुसार प्रभागाचा वर्ग अ मतपत्रिकेचा रंग पांढरा, प्रभागाचा वर्ग ब मतपत्रिकेचा रंग फिका गुलाबी, प्रभागाचा वर्ग क मतपत्रिकेचा रंग फिका पिवळा आणि प्रभागाचा वर्ग ड मतपत्रिकेचा रंग फिका निळा  असे  प्रवर्गानुसार उमेदवारी निश्चित करण्‍यात आलेले आहेत

एका प्रभागाचे सर्व बॅलेट युनिट एकाच मतदान कक्षात (वोटींग कंपार्टमेंट) मध्‍ये राहणार असून प्रभाग निहाय “अ,”ब”,”क”आणि ”ड” अशा मतपत्रिका त्‍यामध्‍ये असणार आहे. मतदारास निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्‍यास “नोटा” चा पर्याय उपलब्‍ध आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सर्व मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात येणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी निवडणूक प्रशासन यंत्रणा सज्‍ज आहे. अहमदनगर शहर महानगर पालिकेच्या येत्या रविवार ९ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर आणि मतदान केंद्रांच्या आत मतदार व उमेदवारांचे प्रतिनिधी (पोलींग एजंट) यांना मोबाईल फोन आणि इतर कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन येण्यास व मोबाईल फोन अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. शहरातील मतदारांनी मतदान करण्यास येताना मोबाईल फोन अथवा इतर कुठल्याही प्रकाराचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन येऊ नये, तसेच मतदान करण्यासाठी मतदान करण्यासाठी येताना मतदारांनी मोबाईल फोन अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणल्यास ते मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतराच्‍या बाहेर ठेवावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची स्वतःची राहील.

सर्व मतदारांनी दिनांक 09 डिसेंबर, 2018 रोजी कुठल्‍याही अमिषाला किंवा प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्‍क बजवावा, तसेच मतदान करण्‍यासाठी कुठलीही व्‍यक्‍ती कोणत्‍या‍ही प्रकारचे अमिष किंवा प्रलोभन दाखवित असल्‍यास आचारसंहिता कक्ष प्रमुख उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा पुरवठा अधिकारी संदीप निचित (भ्रमण दूरध्‍वनी क्र.9665669777) किंवा उपजिल्‍हाधिकारी (भूसंपादन) राजेंद्र वाघ (भ्रमण दूरध्‍वनी क्र.9423468111) यांचेकडे तक्रार करावी, असे अवाहन जिल्‍हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्‍त राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget