DNA Live24 2015

निळवंडेच्या पाण्याची प्रतिक्षेत एक पिढी संपली

संगमनेर :
मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहेत. तरीही महत्वाची बरीच कामं बाकी आहेत. जिरायती जमिनी तर पडीक पडल्यात. कशीबशी बारावी, डिप्लोमा शिजलेली पोरं सलूनच्या दुकानात, चहा टपरीवर कामं करताना दिसताहेत. शेतीत काही राहिलं नाही त्यापेक्षा पानटपरी परवडली अशा प्रतिक्रिया तरूणांनी दिल्या. एका धरणामुळे इतका परिणाम झालाय. तरूणाईमधे शेतीविषयी नकारात्मक भावना आहे.

दरवर्षी दुष्काळ असल्याने निळवंडेचे पाण्याची वाट आमचं म्हतारं बघत होतं, आम्हीही बघतोय असं म्हणत खचलेल्या मनाला वाट मोकळी केली.निळवंडेचे काम झाले असले तरी कालव्याचे काम बाकी आहे. दुष्काळी भागात कालवे बांधणे कठीण जाते.

समस्या कमी आहेत पण त्याच वारंवार पुढे केल्या जातात. पुढचे पाऊल उचलले जातंच नाही.
सरकडेनही कुठलीच मदत अजुनही दिलेली नाही. या प्रश्नावर राजकीय पोळी नेहमीच भाजली जाते. आश्वासनांचा पाऊस पडतो पण निळवंडेच पाणी काही दिसत नाही.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget