DNA Live24 2015

इमानदारी बाकी है यार..!

अहमदनगर:
या कलीयुगात इमानदारी प्रकारच शिल्लक नाही असे आपण म्हणतो. काहीअंशी हे बरोबर आहे. या जगात वावरताना वेगवेगळ्या अनुभव येत असतात म्हणून असे आपण म्हणतो. पण दोन दिवसापूर्वीच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. भारत सोलेपाटील यांना एक वेगळा अनुभव आला. त्यांच्या राहत्या घरापासून जवळच असलेल्या भोसले आखाडा येथील चंदन इस्टेट जवळील कोहिनूर किराणा स्टोअर या ठिकाणी किरकोळ किराणा घेण्यासाठी ते गेले होते. येताजाता या दुकानातून वस्तू घेत असत. काल या दुकानात वस्तू घेण्यासाठी गेले असताना दुकानात एक-दोन ग्राहक होते. श्री. सोलेपाटील यांनी मागीतली ती वस्तू त्यांच्याकडे नव्हती. श्री सोलेपाटील अनुभव सांगताना म्हणाले, दुकान मालक श्री. हाजी फारूक जहागीरदार म्हणाले फार दिवसातून आला आहात माझे  तुमच्याकडे एक काम आहे. श्री. जहागीरदार हे यांच्या समोरील दोन ग्राहकांना किराणा देईपर्यंत माझ्या मनात काय काम असेल यांचे, विचार सुरु झाले होते. माझी तशी या दुकानदाराची काहीच ओळख नव्हती फक्त येताजाता कधीतरी एखादी वस्तू या दुकानातून घेत होतो.

त्या दोन ग्राहकांना वस्तू दिल्यानंतर श्री. जहागीरदार मला म्हणाले, तुम्ही आमच्या दुकानातून दोन महिन्यापूर्वी अंडे विकत घेतली होती का? मी त्यांना म्हणालो नाही मला काहीच आठवत नाही. पण येताजाता तुमच्याकडून किरकोळ वस्तू घेत असतो. पण मला काहीच आठवत नाही असे म्हणालो. श्री जहागीरदार म्हणाले, तुम्ही दोन महिन्यापुर्वी माझ्याकडून अंडी घेऊन गेलात त्या वेळी पैसे देताना तुमच्या कडून पाचशेची नोट खाली पडली होती. मी आपली गेली दोन महिन्यापासून वाट पाहत होतो. माझ्या गल्यात ही नोट तशीच ठेवून दिली आहे. म्हणलं तुम्ही आल्यानंतर द्यावी.

मी त्यांना म्हणालो, मला काहीच खरोखरच आठवत नाही. हे पैसे दुसऱ्याचे असू शकतात. माझेच असतील हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. त्यावर ते म्हणाले, त्या दिवशी कोणकोण दुकानी आले होते व माझ्या शंकेप्रमाणे मी दोनतीन ग्राहकांना विचारलेसुध्दा. पण मला त्या वेळेस पासून खात्री कि ही नोट तुमचीच आहे. असे म्हणून ती पाचशे रूपायाची नोट माझ्या कडे दिली.


श्री भारत सोलेपाटील म्हणाले, या कल़ीयुगात हा अनुभव माझ्या जीवनात सोनेरी आहे. असेही चांगले माणसे या जगात आहेत.या कलीयुगात इमानदारी प्रकार शिल्लक आहे.या जगात हा प्रत्यय पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे. मी या मुस्लिम बांधवाचे पुष्प देऊन आभार मानले आहेच. आपण ही अशा माणसांनचे अभिनंदन केले पाहिजे...

श्री. हाजी फारूक जहागीरदार मोबाईल नंबर  ९१७५८०८६०८

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget