DNA Live24 2015

द्राक्ष उत्पादकांसमोर अवकाळीचे संकट

नाशिक / सांगली :
दक्षिण कर्नाटक आणि दक्षिण भारतातील परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात ढगाळ स्थिती निर्माण होऊन तापमानात विचित्र प्रकारे चढ-उतार होत आहेत. अशावेळी अवकाळी पाऊस होऊन द्राक्ष आणि इतर पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

सध्या राज्यातील बहुतांश भागात गारठा कायम असतानाच पुढील ३-४ दिवस राज्याच्या काही भागात हवामान ढगाळ राहील. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ाच्या भागात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे हा पाऊस कुठे होईल याची शाश्वती नसल्याने द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठेका चुकला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget