DNA Live24 2015

आचारसंहितेची प्रभावी अंमलबाजवणी करावी : जिल्‍हाधिकारी

अहमदनगर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2018 करीता आचारसंहितेची प्रभावी अंमलबाजवणी करणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दूरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणा-या वस्‍तूंच्‍या वाटपावर अंकुश ठेवण्‍याकरिता उपाययोजना करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी तथा आयुक्‍त अहमदनगर महानगरपालिका यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  निवडणूक संनियंत्रण समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे.

या समिती अंतर्गत असलेल्‍या तहसीलदार यांच्‍या स्‍तरावरील समितीची बैठक जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्‍ये निवडणूकीच्‍या काळात आर्थिक गैरप्रकार रोखण्‍यासाठी सर्व बँका, पतसंस्‍था यांनी  त्‍यांचेकडील माहिती देण्‍याकरिता विहित प्रपत्रे करुन देण्‍यात आलेले आहेत. उमेदवार तसेच इतर व्‍यक्‍तीमार्फत दिनांक 26 नोव्‍हेंबर 2018 पासून  एक लाख पेक्षा मोठया सर्व रकमांच्‍या व्‍यवहारांचे, वारंवार होणा-या व्‍यवहारांची तसेच अन्‍य संशयास्‍पद  आर्थिक व्‍यवहारांची  माहिती त्‍याचप्रमाणे  उमेदवारांच्‍या खात्‍यावरील  व्‍यवहारांची माहिती लिड बँक आणि तालुका निबंधक यांचेकडे एकत्रित करण्‍यात येणार आहे.  या माहितीची तपासणी करुन यामध्‍ये संशयास्पद आढळणा-या  व्‍यवहारांची सखोल तपासणी होऊन कारवाई करण्‍यात येणार आहे.  सर्व बँका, पतसंस्‍था यांनी निवडणूका प्रलोभनरहीत होण्‍याकरिता सहकार्य करावे.  या कामात कसूर झाल्‍यास संबंधीतांवर कारवाई करण्‍यात येईल ,अशा सूचना निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्‍या आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget