DNA Live24 2015

केडगावमध्ये आणखी एक खून..!

अहमदनगर :
निवडणूक आणि खून हे केडगावमधील समीकरण पुन्हा एकदा पक्के झाले आहे. येथे आजही एका भांडणाचे पर्यवसान खून प्रकरणात झाले. एका परप्रांतीय टोळक्याच्या हल्ल्यात येथील स्थानिक तरुण अंधारे यांचा खून झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीत केंदंग येथे दोन जणांचा खून झाला होता. त्यामुळे केडगाव हे छोटे उपनगर राज्याच्या पटलावर गेले होते. याप्रकरणी शिवसेना-राष्ट्रवादी+भाजप असा राजकीय सामना त्यावेळी राज्यभर गाजला. आताही येथील काँग्रेसचा मोठा गट थेट भाजपात डेरेदाखल झाल्याने महापालिका निवडणूक पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आहे. त्यातच केडगावात पुन्हा एकदा एक बळी गेल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ही घटना राजकीय स्वरूपाची नसून दोन कामगारांच्या गटातील वाद असल्याची प्राथमिक माहिती समजते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget