DNA Live24 2015

सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी

अहमदनगर :
गावाच्या विकासासाठी कटिबध्द असणारे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच देण्यात आले. तर आजी-माजी सैनिक व शहिद सैनिकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने पाणी पट्टी, घर पट्टी माफ करण्याची तर शहिद जवानांना 25 लाख रुपये देण्याची घोषणा करणार्‍या मुंडे यांचा तिरंगा ध्वज देऊन फाऊंडेशनच्या माजी सैनिकांनी सत्कार केला.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड,संतोष शिंदे, बन्सी दारकुंडे, विठ्ठल लगड, संजय पटेकर, कुशल घुले, अशोक शिरसाठ, रामदास आंधळे, संदीप जावळे, मदन पालवे, सुभाष निंबाळकर, गणेश पालवे, तुषार पोटे, कैलास गर्जे आदि उपस्थित होते. नगर जिल्ह्यात 16 हजार माजी सैनिक तर 19 हजार सैनिक देश सेवेत कार्यरत आहे. तसेच दोनशे शहिद जवानांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करुन मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. सध्या गावातील सरपंचाला 10 हजार, उपसरपंचास 5 हजार तर ग्रामपंचायत सदस्यांना 2 हजार रुपये मानधन मिळते. अत्यंत तोकड्या मानधनात गावाच्या विकासाचे कामकाज त्यांना पहावे लागते. गावाच्या विकासासाठी काही अडचण व समस्या उद्भवल्यास पदरखर्च त्यांना करावा लागतो. वेळोवेळी कामा निमित्त त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यांच्या मानधनात वाढ झाल्यास गावाच्या विकासासाठी आनखी ते झपाट्याने काम करु शकणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget