DNA Live24 2015

शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये असंतोष

अहमदनगर :
दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता करुन तातडीने शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतिबंध घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने नुकतीच करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार व शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आकृतिबंधचा प्रश्‍न दि.25 सप्टेंबर 2005 पासून प्रलंबित आहे. याकरिता शासनाने शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दि.12 जुलै 2015 रोजी समिती गठित केली. या समितीने आपला अहवाल दि.30 जुलै 2015 रोजी शिफारशीसह शासनास सादर केला. परंतु शासनाने आजपर्यंत या अहवालावर निर्णय घोषित केलेला नाही. शासनातर्फे वारंवार आश्‍वासन देण्यात आले परंतु आश्‍वासनाची पूर्तता अद्यापी झाली नसल्यामुळे शासनाबाबत अविश्‍वास निर्माण झाला आहे. या विषयाबाबतचा प्रस्ताव वित्त व नियोजन खात्याकडे प्रलंबित असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या विषयावर अनेक वेळा चर्चा झाली असून दि.5 डिसेंबर 2017 रोजी मंत्रालयामध्ये संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकित हिवाळी अधिवेशनात आकृतीबंध जाहीर करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु दिलेल्या आश्‍वासनानुसार अद्यापि आकृतिबंध घोषित करण्यात आलेला नाही. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशन कालावधीत सुद्धा या विषयावर चर्चा करण्यात आली असता लवकरच आकृतीबंध घोषित करण्याची खात्री देण्यात आली होती.परंतु आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. शाळांमधील प्रशासकीय कामकाजामध्ये अडचण निर्माण होत असून, परिणामी शिक्षकेतर कर्मचारी शासनाच्या वेळकाढू धोरणावर असंतोष व्यक्त करीत आहे. या असंतोषाचा उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना शालेय शिक्षण मंत्री यांनी 15 दिवसात शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतिबंध घोषित करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता करुन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतिबंध बाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्याची मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget