DNA Live24 2015

ट्विटर हँडलवर सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृती

मुंबई : 
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या हँडलद्वारे सायबर गुन्ह्यांबद्दलची सर्वसाधारण माहिती तसेच यासंबंधी घ्यावयाची काळजी याबद्दल नियमित माहिती देण्यात येत आहे. नागरिकांनी या ट्विटर हँडलवरून माहिती घेण्याचे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान वाढत असतानाच देशात सायबर गुन्हेही वाढत आहेत. लोकांमध्ये या विषयी माहिती नसल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने पावले उचलली आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती होणेही महत्त्वाचे आहे. बँकेचा युजर आयडी, एटीएम/डेबीट कार्डचा क्रमांक व पीन, पासवर्ड, ओटीपी कोणाही व्यक्तिला देऊ नये, असे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे.

सायबर गुन्हे कसे घडतात, त्यांची कार्यपद्धती कशी आहे. त्यापासून वाचण्यासाठी काय करावे, याबद्दलची माहिती देण्यासाठी गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल सुरू केले आहे. या ट्विटर हँडलवरून नागरिकांना आवश्यक ती माहिती मिळत असून त्यातून नागरिकांच्या माहितीत भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमितपणे या ट्विटर हँडलला भेट द्यावी व त्याला फॉलो करावे, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.

@'महान्यूज'

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget