DNA Live24 2015

सरकार ‘कुंभकर्णी' झोपेत : उद्धव ठाकरे

मुंबई :
भाजपशी जुळवून घेतल्याचे वाटत असतानाच पुन्हा एकदा दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. याबाबत आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे.

राज्यात दुष्काळ झपाट्याने पसरत असताना राज्य सरकार झोपेत आहे. कुंभकर्णासारख्या गाढ झोपलेल्या सरकारला जागं करण्याची जबाबदारी आता शिवसेनेवर आली आहे. त्यामुळे आम्ही 'कुंभकर्णा जागा हो' अशीच भूमिका घेणार असेही ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या ट्विट करून म्हटले आहे की, राज्यात दुष्काळ भीषण आहे. अशावेळी सरकारला जागे करण्यासाठी आम्ही पंढरपूर येथून 'कुंभकर्णा जागा हो' अभियान हाती घेणार आहोत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget