DNA Live24 2015

योजनांच्या जागृतीसाठी दिव्यांगांना मार्गदर्शन

अहमदनगर :
तालुक्यातील निमगाव वाघा येथे जागतिक अपंग दिना निमित्त स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, प्रहार अपंग क्रांती संघटना व निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. तर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे दिव्यांगांना आवाहन करीत प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. 

 यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सरपंच सुमन डोंगरे, कामगार तलाठी सौ.मेहेर, अनिल डोंगरे, ग्रामसेविका अंजुम शेख, प्रहार अपंग संघटनेचे नगर तालुकाध्यक्ष किशोर सुर्यवंशी, उपाध्यक्ष संजय पुंड, शहर सचिव बाबासाहेब महापुरे, शहर उपाध्यक्ष बाहुबली वायकर, दुध डेअरीचे चेअरमन भरत फलके, मुख्यध्यापक रामदास अडसुरे, अंकुश आतकर, शकुंतला गव्हाणे, विजय शिंदे, किरण सांगळे, जयराम जाधव, मयुर काळे, पै.संदिप डोंगरे, रंगनाथ शिंदे, दिपक गायकवाड आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

गावातील दिव्यांगांना मतदार यादीत नांव नोंदणी, अपंगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र, विविध शासकीय योजनांचा लाभ याबाबत बाबासाहेब महापुरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुलाब केदार, विनोद काळे, विजय गायकवाड, जनाबाई शिंदे, चैतन्य पवार, साईराज काळे, अंजली गायकवाड, बाळू फलके, विठ्ठल केदार या दिव्यांग विद्यार्थी व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. 

पै.नाना डोंगरे म्हणाले की, आलेल्या अपंगत्वावर मात करीत अनेक दिव्यांग बांधवांनी यशाची शिखरे गाठली आहेत. अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता अनेक दिव्यांग बांधव स्वाभिमानाने जगत आहे. जीवनात आत्मविश्‍वास व जीद्द असल्यास ध्येय गाठता येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पुंड यांनी केले. आभार रामदास अडसुरे यांनी मानले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget