DNA Live24 2015

म्हणून मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलकांना अटक

जामखेड (अहमदनगर) :
सध्या आंदोलक असो की शेतकरी त्यांच्याकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची नवी दृष्टी प्रशासनाला लाभली आहे. त्यामुळेच कांदा उत्पादकांचा अन्याय दूर करण्याऐवजी त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. त्याचवेळी नगरचे पालकांनतरी यांच्या विधानावर निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आंदोलन करणाऱ्यांनाही पोलिसांनी अटक करून आंदोलन हणून पडले.

राज्याचे जलसंधारणमंत्री व शिंदे यांच्या नगर जिल्ह्यातील चौंडी येथील बंगल्यासमोर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जनावरे घेऊन आंदोलन केले. मात्र, यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार व पालकमंत्री शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. बारा जणांना पोलिसांनी अटक करून नंतर जामिनावर सुटका केली. कर्जत व जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते चौंडीमध्ये बैलगाड्या, इतर जनावरे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget