DNA Live24 2015

कांदा उत्पादकच देतील झटका..!

भोपाळ :
पाचपैकी सर्वात महत्वाचे राज्य असलेल्या मध्येप्रदेश राज्यात निवडणूक जोरात सुरू आहे. सत्ताधारी भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी येथे काँग्रेस कामाला लागली आहे. मात्र, भाजपचा प्रचार काँग्रेसच्या तुलनेत येथे जोमात आहे. त्याचवेळी कांदा उत्पादकांना मुख्यमंत्री शिवराज सिंह सरकारने राबविल्याने हेच शेतकरी आता सत्ताधाऱ्यांना झटका देणार असल्याची चर्चा आहे.

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने येथील कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार येथील निमाच जिल्ह्यात बहुसंख्य उत्पादकांना कांद्याला ५० पैसे किलो इतका कमी भाव मिळाला होता. रब्बी हंगामात महत्वाचे पीक असलेल्या कांद्याला भाव न मिळाल्याने येथील कांदा उत्पादक रडत आहेत. तर, पैसे असूनही माध्यमवर्गीय भाव वाढले की गळा काढीत आहेत. याच मध्यमवर्गीय मंडळींना खुश करण्याच्या नादात येथील भाजपकडून शेतकरी दुखावला आहे. तोच शेतकरी निवडणुकीत सत्तेला झटका देण्यात यशस्वी ठरल्यास या राज्यात सत्तांतर होईल, असे मतदार सांगत आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget