DNA Live24 2015

दुष्काळी पथक टँकरवाड्यात..!

औरंगाबाद :
महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ गंभीर स्वरूपात पोहचल्यावर आता केंद्र सरकारला याची तीव्रता जाणण्यास सुरुवात झाली आहे. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ५ - ७ डिसेंबर या कालावधीत दहा अधिकाऱ्यांचे पथक मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आलेले आहे.

या दुष्काळी पथकात केंद्रीय सहसचिव छावी झा यांच्यासह डाळवर्गीय पिकाच्या विभागाचे प्रमुख व अर्थ विभागाचे सहसचिव चंद्रा मीना, अन्न व सार्वजनिक वितरण प्रणालीचे प्रमुख एम. जी. टेंबुर्डे, चाऱ्याशी संबंधित विभागाचे प्रमुख विजय ठाकरे, नीती आयोगाचे सहसल्लागार महेश चौधुरे, पाणीपुरवठा विभागाचे एस. सी. शर्मा आदींचा समावेश आहे. राज्य सरकारने दुष्काळ निर्मूलनासाठी केंद्राकडे ७ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्याची ही मागणी योग्य की अवास्तव याची तपासणी या पथकाकडून होणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget