DNA Live24 2015

राष्‍ट्रभक्‍ती रूजविण्‍यात स्‍काऊट गाईडचे योगदान महत्‍वाचे : मुंडे

शिर्डी : 
स्‍काऊट गाईडचा इतिहास वैभवशाली आहे. हा वैभवशाली इतिहास आपल्‍या देशाने जपला आहे. राष्‍ट्रभक्‍ती रूजविण्‍यात स्‍काऊट गाईडचे योगदान महत्‍वाचे असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकास आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.

अहमदनगर तालुक्यातील अरणगाव येथे आज  राज्यस्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याचे उदघाटन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्‍या हस्‍ते झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे होते. यावेळी स्‍वागताध्‍यक्ष खा. दिलीप गांधी,सुजितसिंह ठाकूर, भार्इ नगराळे, ज्ञानोबा मुंडे, अॅड. अभय आगरकर, संतोष मानूरकर, समन्‍वयक शरद दळवी आदी मान्‍यवर उपस्थित होते.

ग्रामविकासमंत्री मुंडे म्‍हणाल्‍या, जिवनामध्‍ये शिस्‍त, राष्‍ट्रभक्‍ती शिकविण्‍याचे महत्‍वाचे कार्य स्‍काऊट गाईडच्‍या माध्‍यमातून घडते आहे. शालेय अ‍भ्‍यासाबरोबरच आपल्‍या देशाबाबतच अभिमान स्‍काऊट गाईडच्‍या माध्‍यमातून रूजविला जात आहे. पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचाव, बेटी पढाव या योजनांसाठी आपण प्रत्‍येकाने पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

पालकमंत्री प्रा. राम‍ शिंदे म्‍हणाले, स्‍काऊट गाईड चळवळ जपण्‍याचे महत्‍वाचे कार्य राज्‍यात होत आहे. राष्‍ट्रभक्‍ती, बंधुत्‍वाची भावना रूजविण्‍यासोबतच व्‍यक्‍तीमत्‍वाचा  विकास करण्‍यासाठी स्‍काऊट गाईड महत्‍वाचे कार्य करत असल्‍याचे सांगतानाच शालेय जिवनापासून या माध्‍यमातून विद्यार्थी घडतात असे त्‍यांनी सांगितले.

स्‍वागताध्‍यक्ष खा. दिलीप गांधी म्‍हणाले, अरणगाव येथे होत असलेल्‍या या सात दिवसाच्‍या शिबिरातून नक्‍कीच विचारांची देवाणघेवाण होईल. प्रा. ज्ञानोबा मुंडे यांनी स्‍काऊट गाईडच्‍या राज्‍यातील कार्याची माहिती दिली.

 प्रास्‍ताविक भाई नगराळे यांनी तर आभार शरद दळवी यांनी मानले. सहावा राज्यस्तरीय स्काऊट गाईड मेळावा अरणगाव येथे मेहेरबाबा ट्रस्टच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुमारे 10 हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मेळाव्याच्या कालावधीत विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वैशिष्ट्य असणारे नृत्यप्रकार आणि सांस्कृतिक देखावेही सादर करण्‍यात आले.  

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget