DNA Live24 2015

म्हणून मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्‍याचे आदेश

अहमदनगर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 कार्यक्रम निश्चित केला असून दिनांक 1 नोव्‍हेंबर 2018 रोजीपासून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. दिनांक  9 डिसेंबर 2018 रोजी निवडणूकीचे प्रत्‍यक्ष मतदान  होऊन दिनांक 10 डिसेंबर 2018 रेाजी मतदानाची मतमोजणी होणार आहे. 

लोकप्रतिनिधीत्‍व  अधिनियम 1957 च्‍या कलम 135 सी नुसार तसेच मुंबई  दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्‍वये समाजत शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी. यासाठी जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन अहमदनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असल्‍याने सार्वत्रिक निवडणूक असलेल्‍या महानगरपालिका क्षेत्रामधील व त्‍या महानगरपालिका सीमेलगत असलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य  संस्‍थेच्‍या ( ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळ व एमआयडीसी ) या  क्षेत्रातील सर्व देशी विदेशी मद्यविक्री दुकाने व परवानाकक्ष अनुज्ञप्‍त्‍या तसेच एफएल/बी आर 2, ताडी विक्री अनुज्ञप्‍त्‍या  दिनांक 8 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण दिवस ( मतदानाच्‍या दिवसाच्‍या अगोदरचा एक दिवस), दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी संपूण दिवस ( मतदानाचा दिवस) व दिनांक 10 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण दिवस (मतमोजणीचा दिवस) या निवडणूक कालावधीत  मद्य विक्रीसाठी बंद ठेवण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहे.

सदरच्‍या दिवशी नमूद कार्यक्षेत्रातील अनुज्ञप्‍त्‍या मद्यविक्री होत असल्‍याचे आढळल्‍यास संबंधीत अनुज्ञप्‍ती   कायमस्‍वरुपी रद्द करण्‍याची कारवाई करण्‍यात येईल  असे जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एका आदेशान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget