DNA Live24 2015

शनिवारी रंगणार महिला कुस्तींचा थरार

अहमदनगर :
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या 21 वी वरिष्ठ महिला व 3 री सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवड चाचणीत महिला कुस्तीचा थरार रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने या जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून, या निवड चाचणीस जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे व आयोजक नगर तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे. 

स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी जि.प. सदस्य माधवराव लामखडे, नगर ता. पंचायत समितीचे सभापती रामदास भोर,  सरपंच सुमन डोंगरे, मा.सरपंच साहेबराव बोडखे, जिल्हा तालिम संघाचे कार्याध्यक्ष पै.रामभाऊ लोंढे, सचिव धनंजय जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, छबुराव जाधव, उद्योजक दिलावर शेख, नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, अ‍ॅड.अभिषेक भगत, पै.विलास चव्हाण, युवराज पठारे, पै.कुंडलिक चिंधे, रविंद्र वाघ, वसंत लकडे, गणपत खेमनर, बबलू धुमाळ, हंगेश्‍वर धायगुडे, गणपत खेमनर, प्रमोद भांडकर, प्रविण घुले, विक्रम बारवकर, बबन काशिद, संदिप बारगुजे, दिपक डावखर, रामभाऊ नळकांडे, आंतराष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री फंड, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, प्रतिभा डोंगरे, मोहन हिरनवाळे, बाळू भापकर, बाळू दुसूंगे, किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, सुभाष नरवडे आदि उपस्थित राहणार आहेत.
वरिष्ठ महिला कुस्ती स्पर्धा निवड चाचणी 50, 53, 55, 57, 59, 62, 65, 68, 72 व 76 किलो पर्यंन्त वजनगट मध्ये होणार आहे. तर सब ज्युनिअर मुली कुस्ती स्पर्धा निवड चाचणी 36 ते 40, 43, 46, 49, 53, 57, 61, 65, 69 व 73 किलो पर्यंन्त वजनगटात होणार आहे. या मुलींच्या कुस्त्या मॅटवर होणार असून, वजन कुस्तीपटूंना सकाळी 8 वा. निमगाव वाघा येथील मिलन मंगल कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. पंच म्हणून पै.गणेश जाधव, पै.संभाजी निकाळजे, पै.समिर पटेल हे काम पाहणार आहेत. या निवड चाचणीतील विजयी कुस्तीपटूंना देवळी वर्धा येथे होणार्‍या 21 वी वरिष्ठ महिला व 3 री सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे मो.नं. 9226735346 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget