DNA Live24 2015

पाहुण्या मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर जनावरे बांधुयात : थोरात

अहमदनगर :
राज्यासाठी पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच चांगलेआहेत. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांच्या सूचनेनुसार आता शेतकऱ्यांनी त्यांच्याच वर्षा बंगल्यावर जनावरे नेऊन बांधावीत. मुख्यमंत्र्यानाकडे जनावरांच्या चारा-पाण्याची उत्तम सोय होईल, अशी कोपरखळी मारीत माजी महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नगरचे पालकमंत्री शिंदे यांनी "चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा", असा अजब सल्ला शेतकरी बांधवांना दिला होता. त्याची व्हिडीओ क्लिप जोरात व्हायरल झाली. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. या 'जबाबदार' विधानाचे सर्वत्र पडसाद उमटू लागल्यावर थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यभर दुष्काळी परिस्थती आहे. तरीही सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत मिळालेली नाही. दुष्काळ असल्याने कोणत्याही आमच्या शेतकऱ्यांच्या पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही. राज्यात एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनावरे नेऊन बांधुयात.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget