DNA Live24 2015

लढाऊ कांदा उत्पादक साठे यांच्यामुळे 'पीएमओ'ला जाग..!

नाशिक :
महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादकांना रडायला लावण्यासाठी सरकारी कोलदांडा यशस्वी ठरला आहे. याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निफाड तालुक्यातील संजय साठे यांनी कांदा विक्रीतून हाती आलेले १०६४ रुपये थेट पंतप्रधान कार्यालयाच्या आपत्ती निवारण निधीला पाठवून दिले होते. त्याचीच दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) साठे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल टीव्ही ९ चॅनेलने बातमी दिली आहे.

चॅनेलने बातमीत म्हटले आहे की, "पंतप्रधान कार्यालयातून निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी फोनवरून रात्री 9 वाजता चौकशी केली."

बीबीसी आणि इतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मराठी बातम्यांतूनही साठे यांचा हा लढाऊ बाणा अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. आता याच कांदा उत्पादकामुळे 'पीएमओ'ला जाग आल्याने, हे कार्यालय कर्तव्याशी कितपत प्रामाणिक राहून शेतकऱ्यांना न्याय देणार, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget