DNA Live24 2015

धर्मा पाटील यांच्या मुलाचे 'शोले स्टाईल' अंदोलन

धुळे :
सरकारी अनास्थेला कंटाळून विखरण येथील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून जीवन संपविले होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येस वर्ष होऊनही कुटुंबियांना अद्याप न्याय मिळाला नाही. तसेच दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आलेल्या निराशेतून धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांनी धुळे येथे 'शोले स्टाईल' आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. पाटील यांनी आज मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. पाटील यांचा आंदोलनाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नरेंद्र पाटील यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय याप्रकरणी कोणता न्याय वापरणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget