DNA Live24 2015

केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

अहमदनगर :
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे तीन सदस्यीय पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेली माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचन्द्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.  या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल.जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासोबत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनीही पथकाशी चर्चा करुन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली.

 हे पथक जिल्ह्यात आज दुपारी औरंगाबाद मार्गे दाखल झाले सुरुवातीला त्यांनी शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारातील विष्णु शंकर सातपुते या शेतकऱ्यांच्या शेतात भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कपाशी आणि तूर पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते. अतिशय आपुलकीने शेतकऱ्यांची संवाद साधत आणि परिस्थितीची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि या संदर्भात केंद्र शासन निश्चितपणे उपायोजना करेल अशी ग्वाही दिली.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती तसेच त्यामुळे परिस्थितीवर झालेला परिणाम आगामी पाणीपुरवठा पाणी पुरवठा होणारा परिणाम पशुधन व चाऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल सादर करण्यात आला.  जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनीही या पथकाची पाथर्डी येथे भेट घेऊन त्यांना जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल अवगत केले या परिस्थितीत या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र शासनाकडून तात्काळ मदत मिळावी या दृष्टीने या पथकाने आपला सकारात्मक अहवाल द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या पथकाने नंतर पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील शिवारातील पिकांची पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी, शेतकरी यांनी,  पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी  मागणी केली.  येथील कोरड्या पडलेल्या पाणीपुरवठा तलावाची पाहणी केली. यानंतर या पथकाने जामखेड आणि कर्जत तालुक्यातील काही गावांची पाहणी केली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget