DNA Live24 2015

कांद्यासह वांगीही मातीमोल..!

अहमदनगर :
कांद्याचे भाव कोसळल्याने राज्यातील हजारो शेतकऱ्यांना एकरी लाख रुपयांचा तोटा आलेला असतानाच आता वांगी या पिकाचेही काटे शेतकऱ्यांना टोचत आहेत. वांग्याला काही ठिकाणी १ रुपया किलोचा भाव मिळत असल्याने शेतकरी उभे पीक उपटून फेकत आहेत.

भाजीमधील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वांग्याला सध्या बुरे दिनचा झटका सहन करावा लागत आहे. कांद्याला १.४१ रुपये किलोचा भाव मिळाल्यानंतर आता वांग्यालाही २० पैसे किलो असा भाव मिळला आहे. अशा भावाने वांगे शेती परवडत नसल्याने नगर जिल्ह्यातील साकुरी येथील राजेंद्र बावके या शेतकऱ्याने शेतातील वांग्यांना उपटून फेकले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget