DNA Live24 2015

म्हणून केली मुख्यमंत्र्यांना ६ रुपयांची मनिऑर्डर..!

संगमनेर (अहमदनगर) :
कांदा उत्पादकांना रास्त भावाऐवजी तोट्यातील मातीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे. अशाच वैतागलेल्या शेतकरी यश संजय आभाळे (रा. अकलापूर) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ रुपयांची मनिऑर्डर पाठवून देऊन निषेधाचा झेंडा फडकावला आहे.

शेतकरी आभाळे यांनी २ एकरांत पिकलेला ५१ गोणी कांदा गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला २ रुपये ५१ पैसे, मध्यम प्रतीसाठी ७५ पैसे व हलक्या प्रतीसाठी ६३ पैसे किलो इतका कमी दर मिळाला. सगळा कांदा विकून त्यांना ३,२०८ रुपये मिळाले. मात्र हमाली, मापाडी, वाहतुक खर्च व वारणी याचा खर्च ३,२०२ रुपये वजा करता आवघे ६ रुपये उरले. बाजारात कवडीमोल भावाने बाजारात कांदा गेल्याने या ६ रुपयांची मनीऑर्डर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget