DNA Live24 2015

"दुष्काळ पाहणी पथक हरवले"

उस्मानाबाद :
राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या आहेत. तसेच आताही येथील दुष्काळ भयावह असाच आहे. मात्र, याचे भान न ठेवत केंद्रीय दुष्काळ पथक जिल्ह्यात न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. याबद्दलचे पोस्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात डकवली आहेत. 
मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे म्हणाले की, जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. देशातील अतिमागास जिल्हा म्हणून उस्मानाबादचा यादीत समावेश आहे. त्यामुळे शासनाकडून मदतीची मोठी अपेक्षा होती.त्याचवेळी केंद्रीय पथकाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. दुष्काळाची दाहकता असूनही जिल्ह्यात शासनाकडून उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सलीम आवटी, हेमंत पाठक, धर्मराज सावंत, सौरभ देशमुख,समीर शेख, मेहराज सय्यद, संजय पवार आदी सहभागी यात झाले होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget