DNA Live24 2015

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळाणा-या अनुदानात वाढ

अहमदनगर :
सामाजिक  न्‍याय व विशेष सहाय विभागाने श्रावण बाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ, इंदिरा गांधी विधवा व संजय गांधी निराधार योजना  अंतर्गत अपंग लाभार्थी, दिव्‍यांग (अपंग), अस्थिव्‍यंग, मतिमंद, अंध या योजनेतील लाभार्थीना दरमहा मिळाणा-या अनुदानात वाढ करण्‍यात आली आहे.  ज्‍या लाभार्थी व्‍यक्‍तीचे अपंगत्‍व 40 ते 79 टक्‍के पर्यत आहे  त्‍या लाभार्थ्‍यास  दरमहा रुपये 600/- ऐवजी 800/- रुपये व 79 टक्‍केच्‍या पुढे अपंगत्‍व असलेल्‍या लाथार्थ्‍यास रुपये 600/- ऐवजी 1000/- रुपये अनुदान देण्‍यात येणार आहे.

नगर तालुक्यातील वरील योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्‍या लाभार्थ्‍यानी जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक यांचे अपंगाचे (दिव्‍यांग) प्रमाणपत्र, ज्‍या बॅकेत अनुदान घेत आहेत  त्‍या बॅकेचे पासबुक झेरॉक्‍स, पासपोर्ट दोन फोटो, लाभार्थी  यांचे आधारकार्डची झेरॉक्‍स, लाभार्थ्‍याची जात,  लाभाथीं वि‍वाहित व अविवाहित तसेच एस.टी कार्ड सवलत आहे का?  याबाबतचे त्‍यांनी स्‍वयंघोषणापत्र  आपले गावातील तलाठी व कोतवाल यांचेकडे सादर करावे.  जे लाभार्थी  तलाठी व कोतवाल यांच्‍याकडे सादर करु शकत नसतील, त्‍यांनी  नगर तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत येथे प्रत्‍यक्ष किंवा दूतामार्फत सादर करावीत असे नगरचे तहसीलदार आप्‍पासाहेब शिंदे यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget