DNA Live24 2015

महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट प्रकल्पात कॅन बायोसिसचा सहभाग



पुणे : 
शाश्वत शेतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्मार्ट नावाचा (स्टेट ऑफ महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन) प्रकल्प नुकताच सुरु करण्यात आला आहे. राज्यातील दहा हजार गावात स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येणार असून प्रकल्पाला जागतिक बॅकेने अर्थ सहाय्य केल आहे. सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कॅन बायोसिस प्रा. लि. कंपनीची निवड करण्यात आली आहे. स्मार्ट प्रकल्पात कॅन बायोसिसचा सहभाग होण्यासाठी कंपनीच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष श्री. अभय मस्के यांनी विशेष प्रयत्न केले होते. 

गेल्या 25 वर्षांपासून रेसीड्यु फ्री शेतमाल उत्पादनासाठी कॅन बायोसिस कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या या कार्याच्ी दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने स्मार्ट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीची निवड केली आहे. रेसीड्यु फ्री शेतमाल निर्मितीसाठी स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत भोसे शेतमाल उत्पादक कंपनी (सोलापुर), अंजिक्यतारा सात्विक शेतमाल उत्पादक कंपनी (सातारा), भामा शेतमाल उत्पादक कंपनी (पुणे) व केंद्राईमाता शेतमाल उत्पादक कंपनी (पुणे) यांच्याशी कॅन बायोसिस कंपनीने करार झाला आहे. शेतकर्‍यांना निर्यातक्षम व विषमुक्त शेतमालाची निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान व मार्गदर्शन कंपनीतर्फे केले जाणार आहे.

रेसीड्यु फ्री शेतमालाच्या निर्मितीसाठी कॅन बायोसिस कंपनी वरील शेतमाल उत्पादक कंपन्यांना कृषी निविष्ठा पुरवणार आहे. भात, आले, हळद व लाल मिरचीच्या दर्जेदार उत्पादनासाठी कॅन बायोसिस प्रामुख्याने कृषी निविष्ठा पुरवणार आहे. शेतमाल उत्पादक कंपन्यांनी निर्माण केलेला रेसिड्यु फ्री शेतमाल कॅन बायोसिस कंपनी खरेदी करणार आहे. त्यामुळे शेतमाल उत्पादक कंपन्यांची शेतमाल विक्रीची चिंता मिटणार आहे.  

स्मार्ट प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणार 
गेली 25 वर्षे कॅन बायोसिस रेसिड्यु फ्री शेतमाल निर्मितीसाठी कृषी निविष्ठांचे उत्पादन व विक्री करीत आहे. आतापर्यंत लाखो शेतकर्‍यांना यामुळे फायदा झाला आहे. आता स्मार्ट प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने कॅन बायोसिसची निवड केली आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
- श्रीमती.  संदीपा कानिटकर 
सी.एम.डी., कॅन बायोसिस प्रा. लि., पुणे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget