DNA Live24 2015

प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर:
महानगरपालिका निवडणूकीची प्रक्रिया चालू आहे. राजकीय तसेच काही इतर पक्षाचे प्रचार चालू आहेत.  त्‍यामुळे काही शुल्‍क  कारणावरुन तणाव निर्माण होवून कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत  नाही.  तसेच 6 डिसेंबर 2018 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व बाबरी मशीद पतन दिन आहे. त्‍यामुळे जिल्‍हयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांचेकडून  विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात येणार आहेत.  तसेच मुस्‍लीम धर्मीयकडून काही आंदोलन करण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. तसेच सध्‍या मराठा समाजास दिलेले आरक्षणामुळे धनगर समाज व मुस्‍लीम धर्मीय यांचेकडून  त्‍यांचे समाजास  सरकारने आरक्षण दयावे या मागणीकरीता आंदोलने करण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहमदनगर  जिल्‍हयात महसूल स्‍थळ  सिमेच्‍या हद्दीत दिनांक  दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजीचे 00.00  पासून ते 19 डिसेंबर 2018  पर्यत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1)(3) चे प्रतिबंधात्मक आदेश  जिल्हादंडाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केला आहे.

 जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य सक्षम अधिका-यांच्‍या पूर्व परवानगी शिवाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.  त्यात  शस्‍त्रे, काठया, सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सध्‍यता  अगर नितीमत्‍ता  यास धक्‍का पोहचेल किंवा शांतता धोक्‍यात येईल असे कोणतेही कृत्‍य करणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे, सार्वजनिक  तयेच खाजगी  ठिकाणी निवडणूक प्रचार  तसेच अन्‍य कारणास्‍तव संभा घेणे, मिरवणुका काढणे, व पाच पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई करण्‍यात येत आहे. सभ्‍यता  अगर नितीमत्‍ता यास धक्‍का पोहचेल किंवा शांतता धोक्‍यात  येईल असे कोणतेही कृत्‍य करणे,  आवेशपूर्ण  भाषणे करणे,  हावभाव करणे, अथवा सोंग आणणे,  अगर तशी चित्रे चिन्‍हे किंवा इतर वस्‍तू तयार करणे किंवा त्‍यांचा प्रचार करणे  इत्‍यादीवर मानई करण्‍यात आली .

शासकीय सेवेतील  व्‍यक्‍तीना ज्‍यांना आपले वरिष्‍ठांचे आदेशानुसार  कर्तव्‍य पुर्तीसाठी  हत्‍यारजवळ बाळगणे आवश्‍यक आहे.  तसेच ज्‍या व्‍यक्‍तींना शारिरीक  दुर्बलतेच्‍या कारणास्‍तव  लाठी अगर काठी वापणे आवश्‍यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धर्मिक मिरवणुका, लग्‍नसमारंभ, लग्‍नाच्‍या मिरवणूका हे कार्यक्रम,  सभा घेणेस अगर मिरवणूक काढण्‍यास ज्‍यांनी संबंधीत प्रभारी पोलिस निरीक्षक तथा सहाय्य पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्‍यक्‍तींना लागू होणार नाहीत. अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सिमेच्‍या हद्दीत  दिनांक 19 डिसेंबर 2018 रोजीचे 24 वाजेपर्यत जारी राहील असे ही एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget