DNA Live24 2015

महायुती पक्की; लोकसभा-विधानसभा एकत्रित..?

मुंबई :
विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेच्या विजय औटी यांना दिल्यानंतर राज्यातील राजकारणाचा सूर एकाच झटक्यात बदलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुसंवादी भूमिका घेऊन महायुती आणखी पक्की करण्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्यातील निवडणूक एकतरी घेणून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाल्याची चर्चाही रंगली आहे.

चार वर्षांत राज्यातील महायुती सरकारामधील बेबनाव नित्याचाच झाला आहे. यात विरोधक कोण आणि सत्ताधारी नेमका कोण, असाच संभ्रम निर्माण करण्यात भाजप-शिवसेना यशस्वी ठरले. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एक होणार असल्याचा संदेश मुंबईतून दिला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला गाफील ठेऊन हा डाव यशस्वीपणे साकार करण्याचा मनसुबा भाजप धुरिणांचा असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाचवेळी घेऊन राज्यात हिंदुत्वाचा खुंटा अधिक बळकट केला जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget