DNA Live24 2015

सरकारी आस्थेचाही 'दुष्काळ'..!

पुणे :
राज्यातील सुमारे ७० टक्के भागाला यंदा दुष्काळाचा फटका बसला असून दुष्काळी भागातील १०० टक्के जनता यामुळे चिंताग्रस्त आहे. त्याचवेळी राज्य व केंद्र सरकारच्या आस्थेचाही दुष्काळ भयाण असल्याचे विदारक वास्तव समोर आल्याची ग्रामीण भागाची भावना झाली आहे.

दुष्काळी की दुष्काळसदृश्य या द्विधेतच सरकारने सर्वसामान्यांना गुंतवून टाकले आहे. केंद्राच्या समितीनेही अनेक ठिकाणी काढता पाय घेऊन शेतकऱ्यांना आणखी चिंतेत टाकले आहे. अशावेळी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असतानाही सरकार कागदी घोडे नाचवित असल्याचे दिसत असल्याने सर्वसामान्य जनता वैतागली आहे. प्रशासनाला अजिबातच सोयरसुतक नसल्यासारखे काम सुरु असतानाच राज्य व केंद्र सरकारने आस्थेचाही दुष्काळ असल्याची पुन्हा एकदा प्रचिती दिल्याची भावना ग्रामीण भागातील शेतकरी व महिला व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget