DNA Live24 2015

मतदान केंद्रावर मनाई आदेश

अहमदनगर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 ची निवडणूकीकरिता 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणूकीसाठी अहमदनगर  शहरात एकूण 337 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्‍यात येणार आहे.  या मतदान केंद्राच्‍या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये.  कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये.  या दृष्‍टीने  मतदान केंद्राच्‍या 100 मीटर परिसरात कोणालाही बेकायदेशीर रित्‍या प्रवेश करता येऊ नये.  मतदानाचे संबंधाने असलेले मतदार व मतदान प्रक्रियातील सर्व  अधिकारी व कर्मचारी उमेदवार/ त्‍याचे निवडणूक प्रतिनिधी, आकाशवाणी अधिकारी कर्मचारी याच्‍या व्‍यतिरिक्‍त कोणात्‍याही व्‍यक्‍तीस मतदान केंद्रात येणास प्रतिबंध होण्‍यासाठी  तसेच मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्‍यासाठी  दिनांक 9 डिसेंबर 2018 रोजी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (3) मनाई आदेश लागू राहतील, असे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उज्‍वला गाडेकर यांनी  मनाई आदेश जारी केला आहे.  

अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान, अहमदनगर शहरातील 337 मतदान केंद्राच्‍या 100 मीटर परिसरात मतदान प्रक्रियाकरिता  प्राधिकृत असलेल्‍या व्‍यक्‍ती व्‍यतिरिक्‍त  इतर व्‍यक्‍तींना प्रवेश सकाळी 6 वाजेपासून ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत प्रतिबंध करण्‍यात येत आहे.  तसेच  मतदानाचा हक्‍क बजावणी करिता आलेले मतदार, मतदान प्रक्रियेकरिता नेमलेले अधिकारी/ कर्मचारी  उमदेवार / त्‍यांचे प्रतिनिधी, मुख्‍य निवडणूक अधिकारी यांनी प्राधिकृत  केलेले पत्रकार, फोटोग्राफर, आकाशवाणी अधिकारी कर्मचारी, बी.एस.एन.एल चे अधिकारी व कर्मचारी , बंदोबस्‍तावर असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी या व्‍यक्‍तींना लागू असणार नाही असे उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती गाडेकर यांनी  एका आदेशान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget