DNA Live24 2015

पाणी फाउंडेशनच्या बक्षिसात अपहार केल्याप्रमाणी सरपंच अपात्र

उस्मानाबाद :
सुप्रसिद्ध अभिनेते अमीर खान पाणी फाउंडेशनमार्फत गावोगावी जलसंधारणाची कामे झाली. मात्र, त्याद्वारे मिळालेल्या बक्षिसात अपहार केल्याप्रमाणी आता एका सरपंच महिलेस अपात्र ठरविण्यात आल्याची घटनाही घडली आहे.

कळंब तालुक्यातील खेर्डा येथील सरपंच सविता पोपट भंडारे या याप्रकरणी अपात्र ठरल्या आहेत. अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी सदर प्रकरणी सुनावणी घेऊन सर्व अभिलेखाची सखोल पडताळणी करून अपात्र त्यांना ठरविले आहे. खेर्डा पाणी फाउंडेशन समितीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २ मध्ये २०१७ मध्ये भाग घेतला. निकषाप्रमाणे श्रमदान तसेच मशिनद्वारे खेर्डा गाव व शिवारातील जलसंधारणाचे मोठ्या प्रमाणात कामे केली. दि. ६ ऑगस्ट २०१७ रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये खेर्डा गावचा द्वितीय क्रमांक आल्याने बक्षीस रक्कम म्हणून ७ लाख ५० हजार रुपये गावाच्या पुढील जलसंधारण कामावर खर्च म्हणून जाहीर करून खेर्डा गावचा सन्मान करण्यात आला होता. सदर बक्षीस रक्कम खेर्डा ग्रामपंचायत ग्रामनिधी खात्यावर जमा झाल्यानंतर सरपंच सविता पोपट भंडारे व ग्रामसेवक पवार यांनी संगणमताने अपहार केला.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget