चार महिन्यांत दोडक्यातून मिळाले एकरी 8 लाखांचे उत्पन्न..!

कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन नफ्याची शेती करता येते. याचाच प्रत्यय दाखवून दिला आहे सोळशी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील श्री. जालिंदर सोळस्कर यांनी. ऐन थंडीत दोडक्यासारख्या वेलवर्गीय पिकाची लागवड करून फक्त चार महिन्यांत सोळस्कर यांनी एका एकरात 8 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. बीव्हीजी कंपनीच्या अ‍ॅग्रो मॅजिक आणि अ‍ॅग्रो सेफ या औषधांच्या नियमित फवारणीमुळे दर्जेदार दोडक्याचे उत्पादन सोळस्कर यांना मिळाले आहे.

दोडका पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना सोळस्कर यांनी सांगितले की, आमच्या शेतात पिकविलेल्या या गुणवत्तापूर्ण दोडक्याची पुण्या-मुंबईतील रिलायन्स आणि इतर कंपन्यांच्या मॉलमध्ये विक्री झाली. तसेच टांझानिया देशातील कृषी सल्लागार मंडळानेही आमच्या शेतावर भेट देऊन बीव्हीजी उन्नती अभियानाचे कौतुक केले. बीव्हीजी कंपनीचे चेअरमन श्री. हणमंतराव गायकवाड यांनी उत्पादन-खर्च कमी करून विषमुक्त शेतीव्दारे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी बीव्हीजी उन्नती अभियान सुरू केले आहे. याच अभियानात सहभागी होऊन नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित अ‍ॅग्रो मॅजिक आणि अ‍ॅग्रो सेफ या दोन्ही औषधांच्या फवारणीमुळे एका एकरात दोडक्यासारख्या वेलवर्गीय भाजीपाला पिकात ऐन थंडीत 8 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न आम्हाला मिळाले. बीव्हीजी लाईफ सायन्स कंपनीची उत्पादने इतर शेतकर्‍यांनीही वापरून आर्थिक उन्नती करावी.

सोळस्कर म्हणाले की, दुष्काळी भागात आम्ही भाजीपाला पिकांची लागवड करतो. थंडीत वेलवर्गीय पिकांची वाढ चांगली होत नसल्याने उत्पादन कमी मिळते. मात्र, बीव्हीजी उन्नती अभियानातील विषमुक्त शेतीसाठीच्या औषधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोडका पिकासाठी त्यांचा वापर करण्याचे ठरविले. एका एकराची चांगली मशागत करून घेऊन 4.5 फुटांच्या बेडवर 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर टाकला. भरखत टाकलेल्या बेडवर 3 फुट अंतराने बियांची लागवड केली. गंधकाच्या धुर फवारणीसह प्रत्येक सात दिवसांनी अ‍ॅग्रो मॅजिक आणि अ‍ॅग्रो सेफ यांची फवारणी केली. या औषधांमुळे मधमाशांसह मित्रकिडींवर कोणताही दुष्परिणाम न होता हानिकारण किड-रोगांचा बंदोबस्त झाला. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे हिरवागार चकाकीयुक्त दोडक्याचा माल मिळाला. त्यामुळे आमच्या दोडक्यास 20 ते 25 रुपये प्रतिकिलोचा भावही मिळाला. इतरांपेक्षा हा भाव चांगला होता. पिकाच्या व्यवस्थापनासाठी चार महिन्यांत सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च झाला. आम्हाला सुमारे 50 टन उत्पादन मिळाल्याने एकुण खर्च वजा करता 8 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*