तीन जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे :
पूर्णवेळ कृषीमंत्री नसलेल्या राज्याच्या कृषी विभागाने आता पुन्हा एकदा बदल्यांच्या फायलींना हात घातला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी अशा पद्धतीने कृषीसह इतरही विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने नंदुरबार, नाशिक व नागपूर येथील ती अधिकाऱ्यांना तात्काळ पदस्थापना देण्यात आलेली आहे. नंदुरबार येथील उपविभागीय कृषी अधिकारी रमेश मोतीराम शिंदे यांची बदली नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी पदावर करण्यात आली आहे. तर, नाशिकचे कृषी विकास अधिकारी हेमंत अमृतराव काळे यांना बादलीने शिंदे यांच्या जागेवर संधी मिळाली आहे. तसेच उमरेड (जि. नागपूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी डी. एम. दिवटे यांची बदली औरंगाबाद येथील कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी उपसंचालक पदावर करण्यात आलेली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*