राहुरी विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान मेळावा

अहमदनगर :
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीने शुक्रवारी (दि. १ फेब्रुवारी) पीक तंत्रज्ञान मेळावा व शिवार फेरीचे आयोजन केले आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाच्या कार्यस्थळावर आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू के. पी. विश्वनाथा असतील. यावेळी पीव्हीपी एफआरए संस्थेचे चेअरमन डॉ. के. व्ही. प्रभू, इक्रिसॅटचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. अशोक कुमार, फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे आदी मार्गदर्शन करणार आहेत. ज्वारी, हरभरा, करडई, भाजीपाला आदींच्या सुमारे ५३ वाणांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार असल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*