गरज स्वतंत्र कृषी अर्थसंकल्पाची

पुणे :

भारतीय अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर आधरित असतानाही अर्थसंकल्पात कृषीक्षेत्राला विशेष दर्जा नाही. याउलट सध्या शेतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. अशावेळी केंद्र सरकारने शेतीसाठी स्वतंत्र बजेट सादर करण्याची मागणी होत आहे.

शेतकरी संघटनांसह शेतकरी बांधवांनीही याची गरज बोलून दाखविली आहे. याबद्दल टाईम्स ऑफ इंडियाने विशेष वृत्त प्रसिध्द केले आहे. या इंग्रजी वृत्तपत्राचे नाशिक येथील प्रतिनिधी तुषार पवार यांनी याबाबतची बातमी केली आहे.

बातमीत शेतकऱ्यांच्या मागणीचा दाखला देतानाच देशाची गरजही दाखवून दिलेली आहे. प्रतिवर्षी अशा मागणीसाठी संघटना निवेदन देतात. शेतकरी नेते शरद जोशी यांनीही खासदार म्हणून याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, अजूनही ही मागणी एकही सरकारने पूर्ण केलेली नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*