मोबाईलवरून होणार पिक नोंदणी

नाशिक :

तलाठ्याकडून पिकाची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पीकविमा, बँक कर्ज किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना या सरकारी बाबूंची मोठी मिनतवारी करावी लागते. मात्र, आता आधुनिक युगात यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यानुसार काही मोजक्या तालुक्यात सध्या प्रायोगिक तत्वावर शेतकरी आपल्या स्मार्ट फोनवरून पिकाची नोंदणी करू शकतील.

डिजिटल इंडियाचे गोडवे गातानाही आपल्याकडे शेती आणि ग्रामीण भागाची कागदपत्रांसाठी पिळवणूक जोरात आहे. तलाठी, मंडळाधिकारी व तहसीलदार कचेरी यांच्याच कचाट्यात भारतीय शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. हेच टाळण्यासाठी ऑनलाईन उतारे देण्यासह आता शेतकऱ्यांनाच आपल्या उताऱ्यावर पिकाची पेरणी व लागवड नोंदणी करण्याची सोय दिली जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सध्या असा प्रकल्प राबविला जात आहे. शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केल्यानंतर त्यास तलाठी मान्यता देणार आहे. मात्र, यापूर्वी ऑनलाईन ७/१२ उतारे देण्याची योजना शेतकऱ्यांसाठीच डोकेदुखी ठरली होती. त्यातील तांत्रिक त्रुटीमुळे ग्रामीण भाग वैतागला आहे. याचीच पुनरावृत्ती या योजनेत टाळण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*