सरकारी अभ्यासातून मिळणार शेतमालास भाव..!

दिल्ली :

शेतमालाच्या किमती बाजारात पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांतून सरकारी धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होतो. हेच टाळण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने काही पिकांवर अभ्यास करून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची सोय कारण्याची तयारी केली आहे. या अभ्यासातून शेतकऱ्यांचा कितपत फायदा होतो, यावर या योजनेचे फलित ठरणार आहे.

केंद्रीय कृषी विभागाचे संयुक्त सचिन प्रशांत स्वैन यांनी या योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, पहिल्या टप्प्यात हरबरा, कांदा, बटाटा, गहू आणि मोहरी यांची माहिती संकलित करून पाठविली जाणार आहे. त्यानंतर यातील त्रुटी दूर करून फलोत्पादन पिकांचीही माहिती देण्याची सोय विभागातर्फे केली जाईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*