आता मिळणारा 1.६० लाखांचे बिनव्याजी कर्ज..!

मुंबई :

द्विमाही पतधोरण काजीर करताना रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी औदार्याची भावना दाखविली आहे. त्यानुसार यापुढे शेतकऱ्यांना 1 लाखांऐवजी यापुढे 1 लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळू शकते. आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त केंद्र सरकारने आरबीआयमार्फत पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ही मोठी भेट दिलेली आहे.

आजचे पतधोरण जाहीर करताना दास यांनी ०.२५ टक्क्यांनी रेपो दरात घट करून मध्यमवर्गीय व उद्योजकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बिगर व्याजी कर्जाच्या मर्यादेत ६० हजार रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. या निर्णयाचे शेअर बाजारानेही जोरदार स्वागत केले आहे. आता कर्जाच्या व्याजदरात होणारी घट गृहकर्ज व व्यावसायिक कर्जदारांसाठी मोठा लाभ देणारे ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*