
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे निकष जाहिर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून सर्व बाद
किसान सन्मान योजनेचे निकष राज्य सरकारने जाहिर केले आहेत. सदर योजनेअंतर्गत सहा हजारांचे साहाय्य दिले जाणार आहे. तसेच योजना संबंधीत अधिकारी आणि विभाग यांनाही फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
हे असतील अपात्र:
आजी-माजी खासदार
आजी-माजी मंत्री
आजी-माजी आमदार
आजी-माजी महापौर
आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य
संवैधानिक पद असलेले आजी-माजी व्यक्ती
किसान सन्मान योजनेचा असा आहे कालबद्ध कार्यक्रम:
1 – जिल्हाधिकारी यांची महत्वाची जबाबदारी असेल. त्यांच्या सोबतच सीईओ, एसएओ हे जिल्ह्यात काम करतील.
2- कृषी तहसिलदार, बीडीओ, यांच्यासोबत ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे तालुक्याच्या स्तरांवर कामाची जबाबदारी असेल.
3- शेतकर्यांचे आधार कार्ड, बँक खाते व मोबाईल नंबर हि माहिती ग्रामसेवक संकलीत करतील.
Be the first to comment