कुकडीचे पाणी पिण्यासाठी की शेतीसाठी ?

श्रीगोंदा:
कुकडीच्या सल्लागार समिती नुकत्याच झालेल्या बैठकीत अवास्तव पाण्याची मागणी झाली आहे त्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढे ढकलला आहे. पुणे आणि अहमदनगर साठी पिण्याच्या पाण्याची जास्त प्रमाणात मागणी करण्यात आली. फक्त 29 टक्के पाणीसाठा शिल्लक असताना पाणी पिण्यासाठी द्यायचे की शेतीसाठी द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कुकडीची ही बैठक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.पिण्याच्या पाण्याची गरज किती आहे हे पुन्हा अभ्यासुन पुढील आढावा तयार करा अशी सुचना यावेळी करण्यात आली. पुढील बैठक परत चार दिवसात होणार आहे यावेळी अहमदनगर अणि पुणेसाठी पिण्याच्या पाण्याची मागणी किती होते यावर शेतीचा किती पाणी देणार हे ठरणार आहे.
या बैठकीला जलसंपदा मंत्री (राज्य) विजय शिवतारे, आ.दिलीप वळले, आ.राहूल जगताप आणि संबंधित उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*