कांदाचाळीसाठी 135 प्रस्ताव मंजूर

अहमदनगर:
कांदाचाळीचे काही प्रस्ताव मंजूर झाल्याने कांदाचाळीचे सगळेच प्रस्ताव मंजूर होतील अशी आशा आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकर्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक कांदाचाळीसाठी 85 हजार 500 रूपये अनुदान दिले जाते.

एकूण 234 प्रस्ताव मंजुरीसाठी देण्यात आलेले होते. त्यापैकी 134 प्रस्ताव मंजूर झाले तर उर्वरित प्रस्तावांनाही परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेण्यात आलेले आहे. तब्बल 459 हेक्टर क्षेत्र कांद्याचे आहे. त्यामुळे यावेळीही कांदा विक्रमी उत्पादन करण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*