13 फेब्रुवारीला राज्यस्तरीय कर्जमुक्ती परिषद

अहमदनगर :
उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात कमी भाव मिळाल्याने कर्जाच्या फेऱ्यात सापडलेल्या पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरकारने संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी वअहमदनगर येथे 13 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन केल्याची माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, कोषाध्यक्ष उमेश देशमुख व उदय नारकर यांनी दिली आहे.

राज्यभरातून हजारो पॉलिहॉऊस शेडनेटधारक शेतकरी या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. अहमदनगर येथील सैनिक लाॅन्स येथे सकाळी ११ वाजता मेळावा सुरू होईल. यावेळी शेडनेट पॉलिहाऊस धारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी न्यायालयीन लढाई लढण्याबाबत तयारी केली जाणार आहे. या परिषदेत सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र पॉलिहॉऊस शेटनेटधारक शेतकरी समन्वयक समितीचे बाळासाहेब दरंदले, बाळासाहेब गडाख, अरविंद देसाई, प्रल्हाद बोरसे, अंकुश पडवळे, दिलीप डेंगळे, किरण अरगडे, महेश शेटे, सुजाता थेटे, मनोज आहेर, अण्णा सुंब, शिवाजी तळेकर, अनिरुध्द रेडेकर, शिवाजी नाईक, संजय तळेकर, नामदेव जाधव, विकास वाघ, भालचंद्र दौंडकर, वासुदेव चौधरी यांनी केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*