कपाशीचा भाव पाच हजारांवर स्थिर

औरंगाबाद :
विदर्भासह मराठवाडा आणि गुजरात, आंध्रप्रदेश अशा भागाचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख बनविलेल्या कपाशीला सध्या बाजारात तुलनेने खूपच कमी भाव मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कापूस पिकाचे सरासरी भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान स्थिरावले आहेत.

बाजार समितीच्या माहितीनुसार सध्या अकोट बाजारात ५६०० रुपये असा सर्वाधिक भाव मिळत आहे. तर, सर्वात कमी भाव परभणी बाजार समितीत ४५०० रुपये असा मिळत आहे. इतर ठिकाणचे सरासरी भाव असे : सिल्लोड ५४००. परतूर ५३२५, किनवट ५२५०, अकोट ५५००, जालना ५३५०, परभणी ५४५०, घाटंजी ५५००, मानवत ५४९१, काटोल ५१००, यावल ५२००, मारेगाव ५३५०, पांढरकवडा ५३००, पुलगाव ५३५० आदी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*