शारीरिक समतोल राखण्यासाठी खा कवठ..!

दक्षिण भारत हे मूलस्थान असलेल्या कवठाची झाडे महाराष्ट्रातही दिसतात. अवर्षणप्रवण भागातील बरड माळरानावर किंवा नदी व ओढ्याच्या किनारी कवठ वृक्ष आढळते. टणक असलेल्या या फळांमधील तुरट, आंबट व गोडसर चवीच्या गराला आहारात व आयुर्वेदात मोठे महत्व आहे.

पिकलेले कवठ खाल्ल्याने आपल्या शरीरात असलेले उष्ण, पित्त, वात या तिन्ही दोषांचं संतुलन होते. एकूणच शरीराच्या समतोलासाठी कवठ खाण्याचा सल्ला आयुर्वेदात त्यामुळेच दिला जातो. पित्ताचे नियंत्रण या फळांमुळे होते. पित्तामुळे अंगावर येणाऱ्या गांधी घालविण्यासाठी कवठाच्या हिरव्या पाल्याचा रस लावावा. तसेच हाच पाला दही व खडीसाखरेत एकत्रित करून सेवन केल्यानेही फायदा होतो.

मुळव्याधी आलेल्यांनी कवठाच्या बिया व धागे काढलेला मऊ गर ताकासह खावा. वातदोष, उचकी, दमा, क्षयरोग, रक्तविकार, उलटी, विष, तृष्णा, ग्लानी असे विकार असलेल्यांनी कवठाचे नियमित सेवन करावे. ताजे फळ उपलब्ध नसतानाही कवठाची चटणी किंवा वळविला चांगला गर वापरता येऊ शकतो. कवठ फळात अ, ब आणि क हे तीन जीवनसत्व असतात. याचा जेली, चटणी, मुरंबा व बर्फी यांनाही मोठी मागणी आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी या फळाचा प्रक्रिया व्यवसाय करून अर्थार्जनाची संधी साधने आवश्यक आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*