येवला, पंढरपुरात कांदा ५० पैसे किलो..!

पुणे :
कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे अगदीच मावळली आहेत. त्याउलट लाल कांद्याला सध्या बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. सध्या येवला (जि. नाशिक) आणि पंढरपूर (जि. सोलापूर) येथील बाजार समितीत कांद्याला ५० पैसे किलोचा भाव मिळत आहे.

कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झालेली असतानाच आता राज्यभरात मागील दीड महिन्यांपूर्वी सरासरी ५५० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या कांद्याचा भाव ३०० रुपयांनी कमी होऊन २५० च्या दरम्यान घसरला आहे. पुण्यातील मोशी, खडकी व पिंपरी बाजारात कांद्याला ३०० ते ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. मुंबईच्या मार्केटमध्येही चांगल्या कांद्याला ३०० ते ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ग्रेड २ व ३ च्या कांद्याला मात्र २५ ते ९० पैसे असाच भाव मिळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*